Subscribe Us

header ads

टोकवाडी गाव संघर्षाच्या काळापासून माझ्या सोबत, गावाची स्मार्ट व आदर्श गावात नोंद व्हावी यासाठी आवश्यक तितका निधी देऊ - धनंजय मुंडे

बीड स्पीड न्यूज 


टोकवाडी गाव संघर्षाच्या काळापासून माझ्या सोबत, गावाची स्मार्ट व आदर्श गावात नोंद व्हावी यासाठी आवश्यक तितका निधी देऊ - धनंजय मुंडे

धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून परळी तालुक्यातील ग्रामीण विकासाचा टक्का वाढतोय - अजय मुंडे

ना. मुंडे साहेबांच्या प्रत्येक लढाईत टोकवाडी समर्थ साथ देईल - सभापती पिंटू मुंडे

परळी (दि. 13) ---- : टोकवाडी या गावाने मला माझ्या संघर्षाच्या काळापासून साथ दिली आहे. या गावाची कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांच्या माध्यमातून स्मार्ट व आदर्श गावाकडे वाटचाल सुरू आहे, या वाटचालीत 

आवश्यक तिथे व आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देऊ असा शब्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी टोकवाडी येथे आयोजित विविध पूर्ण झालेल्या विकासकामांच्या लोकपर्ण व नव्याने हाती घेण्यात आलेल्या कामांच्या 

शुभारंभ प्रसंगी बोलताना दिला.टोकवाडी हे गाव परळी शहराला लागून असल्याने याचा चारही बाजूंनी विकास होत आहे, गावात जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामविकास विभाग आदी विविध 

योजनांमधून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, तसेच ग्राम पंचायतीने मागणी केल्याप्रमाणे पुढील कामांसाठी आणखी निधी देण्याचा शब्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.टोकवाडी येथे २५१५ 

योजनेमधून गावातील सिमेंट रस्त्यासाठी ६८ लाख, देवीच्या समोरील सभागृहासाठी -१० लाख, हायमास्ट दिवे बसवण्यासाठी साठी - २५ लाख,  शादी खाण्यासाठी -१४ लाख, पंचायत समिती १५ व्या वित्तआयोगातुन  मातंग व जोशी स्मशान भूमीसाठी -१० लाख, डी.पी.डी .सी  मधून मागासवर्गीय स्मशानभूमीसाठी -५ लाख, सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी सिमेंटचे बाकडे -१०लाख, पंचायत समिती लोकल सेस मधून गाव अंतर्गत सिमेंट रस्ता -१० लाख, गावातील मागासवर्गीय वस्तीसाठी बंदिस्त नाली - १५ लाख असे एकूण  - १ कोटी ५९ लाख रु निधी खर्च करण्यात आला असून, या कामांचे लोकार्पण ना. मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.त्याचबरोबर जि.प.शाळेसाठी -२० लाख, बुद्धविहारासाठी -२० लाख, नेहरूनगर जि.प.शाळेसाठी - १८ लाख, अंगणवाडी बांधकामासाठी -८.५ लाख, कब्रस्थान विस्तारासाठी - १० लाख निधी नव्याने उपलब्ध करून देण्यात आला असून, या कामांचा शुभारंभ ना मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.ना. धनंजय मुंडे हे मंत्री झाल्यापासून गावासाठी आत्तापर्यंत  -२ कोटी ३५ लाख रु निधी दिला. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने ना. 


मुंडेंचे आभार व्यक्त करत सन्मान करण्यात आला.धनंजय मुंडे हे विकासाभिमुख नेतृत्व असून, परळी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचा ना. मुंडेंच्या प्रयत्नातून टक्का वाढतो आहे, असे मत जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे यांनी व्यक्त केले.गावासाठी स्वखर्चातून गोरगरिबांसाठी ५१ शौचालय बांधून दिले. जि.प.शाळेच्या उदघाटनाला येताना रिकाम्या हाताने न -येता गावासाठी -३० लाख रु निधी विकासासाठी ना. धनंजय मुंडे हे घेऊन आले आहेत, साहेबानी टोकवाडीवर कायम प्रेम दाखवले आहे. आम्ही सर्व गावकरी साहेबाच्या प्रत्येक लढाई मध्ये कायम सोबत राहू असे अभिवचन गावचे सुपुत्र परळी पंचायत समितीचे सभापती पिंटू मुंडे यांनी यावेळी बोलताना दिले.डॉ. राजाराम मुंडे यांनी यावेळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी काही मागण्या ना. मुंडे यांच्या समोर सादर केल्या, त्या मागण्याही यथावकाश मान्य करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.या कार्यक्रमास ना. धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, गावच्या सरपंच सौ. गोदावरीताई मुंडे, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, सभापती पिंटू मुंडे, उपसभापती जानिमिया कुरेशी, डॉ. राजाराम मुंडे, मोहनराव सोळंके, विष्णुपंत सोळंके, माणिकभाऊ फड, माऊली तात्या गडदे, माधवराव मुंडे, माऊली मुंडे, वसंतराव तिडके, शिवाजीराव शिंदे, प्रभाकर पोळ, शरद राडकर, नागनाथ कराड, हरणावळ नाना, बापू नागरगोजे, हरीश नागरगोजे, वसंतराव राठोड, दशरथ मुंडे, सौ. उषाताई रोडे, अश्रूबा काळे, मनोहर केदार, रुस्तुमरक सलगर, विश्वनाथ देवकते, भागवत मुंडे, बाळासाहेब सोळंके, माणिक मुंडे, भानुदास मुंडे, महादेव मुळे, उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, गटविकास अधिकारी श्री. केंद्रे ग्रामसेवक श्रीमती रांजणकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा