Subscribe Us

header ads

जि. प. प्रा. शाळा वाकनाथपुर येथे पहिली ते चौथी वर्गाला एकच शिक्षक; आणखीन एका शिक्षकांना रुजू करा वाकनाथपुर पालक वर्गाची मागणी



प्रतिनधी नवनाथ गोरे

जि. प. प्रा. शाळा वाकनाथपुर येथे पहिली ते चौथी वर्गाला एकच शिक्षक; आणखीन एका शिक्षकांना रुजू करा वाकनाथपुर पालक वर्गाची मागणी



वाकनाथपुर प्रतिनिधी_कोरोना महामारी ने दोन वर्ष शाळा कॉलेज बंद करण्यात आले होते. आता काही महिना पूर्वी शाळा सुरू करण्यात आल्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी. पालक. शिक्षक खूप खुश झाले आहेत. खूप दिवस शाळा बंद राहिल्याने शिक्षणावर खूप मोठा परिणाम झाला आहे. आता विद्यार्थी खूप मेहनतीने अभ्यास करत आहेत. परंतु वाकनाथपुर येथे पहिली ते चौथी पर्यत उर्दू आणि मराठी माध्यम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. परंतु मराठी माध्यम ला पहिली ते चौथी पर्यंत एकच शिक्षक आहेत. एक शिक्षक असल्याने मुलांना नीट शिकवता येत नाही. आणि एक शिक्षक कोणत्या कोणत्या वर्गातील मुलांना शिकवतील हा मोठा प्रश्न आहे. एक शिक्षक असल्या कारणाने मुलांचा अभ्यास होत नाही. आणि कोणती मीटिंग असल्यास एक शिक्षक मीटिंग ला जातील का शाळा भरवतील तरी वाकनाथपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लवकरात लवकर आणखीन एक शिक्षकांना रुजू करावे अशी मागणी वाकनाथपुर येथील पालक वर्ग करत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक