Subscribe Us

header ads

बीड मध्ये सावकारकी, अवैध दारू विक्री, वाळु तस्करी, मटका, चक्री, गांजा विक्री, असे अवैध धंदे सर्रास पणे सुरु; सध्या बीडचा बिहार झाल्यासारखे चित्र.

बीड स्पीड न्यूज 


बीड मध्ये सावकारकी, अवैध दारू विक्री, वाळु तस्करी, मटका, चक्री, गांजा विक्री, असे अवैध धंदे सर्रास पणे सुरु; सध्या बीडचा बिहार झाल्यासारखे चित्र.

पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांनी भ्रष्ट अधिकारी, व दोन नंबर वाल्यांवर कडक नियम करावा -  जिल्हाध्यक्ष, बाळासाहेब धुरंधरे

पोलीसांनी सावकारकी, वाळुमाफीया, अवैध दारू विक्री, चक्री, मटका, अशा अवैध धंदा चालकांच्या वेळीच मुसक्या आवळाव्यात.

बीड प्रतिनिधी_ सध्या बीड शहरात सावकारकीने डोके वर काढले आहे अगोदरच कसाबसा कोरोणाचे प्रमाण कमी झाले आणी लोक कामा-धंद्याला लागुन काही महीने झाले नाहीच तोच उसणे पासणे केलेल्या पैशासाठी बीड मधील सावकारांनी डोके वर काढले आहे. तर काही सावकार लोकांकडुन घेण्यात आलेल्या चेक वर अव्वाची- सव्वा रक्कम टाकुन पैसे वसुलीसाठी दावा न्यायालयात दाखल करतांना दिसत आहेत. शहरात बऱ्याच अशा घटना पहावयास मिळत आहेत सावकारांना कंटाळलेल्या लोकांनी दाद मागायची तरी कोणाला असा प्रशन आता या सावकारकीला बळी पडलेल्या लोकांना पडली आहेत कारण पोलीस प्रशासन सुध्दा या अवैध सावकारकीला फारशी आवर घालताना दिसत नाही. याच मुळे बीड मधील सावकारांनी "सब राज हमारा" असा समज मानलेला दिसतो आहे. त्याचबरोबर बीड जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार चर्चित आहे, अवैध वाळू उपश्या मुळे चार निष्पाप बालकांचा जीव गेला आहे, मंडल अधिकारी स्वर्गीय नितीन जाधव याचा मृत्यू, भूमाफीया गोळीबार, अधिकारी संगमत करून देवस्थानच्या जमीन बोगस विक्री, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले मोठाले घोटाळे, अशा मोठ्या भ्रष्टाचाराचने बीड जिल्हा चर्चित झाला आहे. याच मुळे सध्या बीड जिल्ह्याचे बोलके चित्र बीहार झाल्या सारखे दिसत आहे असे सर्वत्र जनतेत चर्चा आहे. या अवैध सावकारी, अवैध दारू विक्री, वाळुमाफीया, चक्री, गांजा, मटका विक्री वर खुद पालकमंत्र्यांनी वेळीच लक्ष घालुन भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना कडक नियम करावा असे विनंती चे आवाहन राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब धुरंधरे यांनी प्रसारमाध्यमां द्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा