Subscribe Us

header ads

लव्हुरी येथील विकास कामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी समितीने दखल न घेतल्याने ३० मार्च पासुन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष व ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरु.

बीड स्पीड न्यूज 

लव्हुरी येथील विकास कामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी समितीने दखल न घेतल्याने ३० मार्च पासुन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष व ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरु .


केज / प्रतिनिधी -:केज तालुक्यातील मौजे लव्हुरी येथील विवीध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचार चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी समितीने कसल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसल्यामुळे दिनांक  ३०-०३-२०२२ पासुन आमरण उपोषण सुरु करण्यात आले असल्याची माहीती  संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कैलास चाळक यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत असे की,दिनांक ०५-११-२०२० रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.त्यानंतर श्री. एम.एस.चव्हाण,विस्तार अधिकारी व श्री बी.डी.राउत यांची नियुक्ती केली.दोन्ही चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेले अहवाल परस्पर विरोधी आहेत.सदरील चौकशी समितीने स्थळ पंचनामा न करता केवळ कागदोपञी अहवाल बनवला आहे.तक्रारीमध्ये नवबौद्ध घटकांचा विकास  योजने अंतर्गत पारधेवस्ती रस्ता हे काम अंदाज पञकीय तरतुदीपेक्षा कमी केले आहे.चौकशी समितीने कामाचे प्रत्यक्ष मोजमाप न करता अभिलेखे उपलब्ध नसल्याचा अहवाल दिला आहे.तसेच अण्णाभाऊ साठेनगर येथे ९ पथदिव्यांना मंजुरी असताना प्रत्यक्ष २ दिवे बसवले आहेत. तरीपण चौकशी समितीने स्थळ पाहणी न करता वेगवेगळे अहवाल दिले आहेत.खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत पथदिवे यांचे अभिलेखे उपलब्ध नाहीत.अभिलेखे नसताना कशाची चौकशी केली? वरील सर्व चौकशीमध्ये २५/१५ आमदार फंड, खासदार फंड यातील कामे न करता ही चौकशी समितीने जाणीवपूर्वक उल्लेख टाळलेले आहेत.श्री राउत बी.डी,यांनी चौकशी अहवाल सादर करतेवेळी अभिलेखा आधारे अहवाल सादर केला परंतु श्री चव्हाण एम.एस.यांनी तांत्रिक दृष्ट्या तपासणी करणे गरजेचे असताना कोणतेही अभिलेखे अथवा कामाची स्थळ पाहणी न करता खोटे अहवाल सादर करुन भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार केला आहे.दिनांक २३-०३-२०२२ पर्यत चौकशी समिती  चौकशी न केल्यास  दिनांक ३०-०३-२०२२ पासुन ग्रामपंचायत कार्यालय लव्हुरी येथे बेमुदत आमरण उपोषण करण्याचा ईशारा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कैलास चाळक,अशोक चाळक यांनी दिला होता. फेरचौकशी न केल्यामुळे आमरण उपोषण दिनांक ३०-०३-२०२२ रोजी पासुन ग्रामस्थांचे उपोषण चालु झाले असुन फेरचौकशी करुन भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा ईशारा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष श्री.कैलास चाळक व ग्रामस्थानी दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा