Subscribe Us

header ads

अॅटोचालक व मालक संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोफत पिण्याचे पाणी शहर पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार साहेबांच्या हस्ते शुभारंभ

बीड स्पीड न्यूज 


अॅटोचालक व मालक संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोफत पिण्याचे पाणी शहर पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार साहेबांच्या हस्ते शुभारंभ

अंबाजोगाई प्रतिनिधी:- अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातुन येणाऱ्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात पिण्याचे पाण्याची सोय नसल्यामुळे रुग्णांना पाण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते ग्रामीण भागातुन येणाऱ्या रुग्णांची परिस्थिती नसल्याने हे रुग्ण त्यांचे नातेवाईक रुग्णालय आतील किंवा बाहेरील हाॅटेलचा आधार घेतात उन्हाचा तडाखा दिवसभर जाणवत असल्यामुळे रस्त्यावर जाणाऱ्या अबालवृद्ध महिला व वयस्कर व्यक्तीना तहाण लागल्यास हाॅटेलांचा आधार न घेता सामाजिक बांधिलकीतुन रुग्ण-नातेवाईकांना , नागरिकांना थंडगार पाणी मिळावे या हेतुने रुग्णालय बाहेरील चौकात अॅटो चालक व मालक संघटनेच्या वतीने मोफत पिण्याचे पाण्याची अंबाजोगाई शहर 

पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार साहेबांना शाळ, पुष्पगुच्छ देवुन हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते न्यामत भाई पठाण,जहिर भाई पठाण,ए आय एम आय एम पक्षाचे बीड जिल्हा प्रवक्ता शेख रमीज सर, प्रहार जनशक्ती पक्षाचे बीड जिल्हा संघटक जहांगीर पठाण,ए आय एम आय एम पक्षाचे अंबाजोगाई शहर अध्यक्ष हिफाजत पठाण, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे मराठवाडा संपर्क प्रमुख मोहंमद ताहेर,अॅटोचालक व मालक संघटनेचे अध्यक्ष माजेद भाई पठाण, पत्रकार उमेशजी शिंदे,हाशम भाई,निजाम भाई, पत्रकार शेख फेरोज, पत्रकार मुकरम पठाण,मुद्दसर भाई,अॅटोचालक व मालक संघटनेचे उपाध्यक्ष नय्युम भाई,अज्जु भाई, जोगदंड भाऊ व अॅटोचालक मालक आदींसह कार्यकर्ते उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा