Subscribe Us

header ads

हजरत शहंशाह वली दर्गाह वक्फ घोटाळ्यात पोलिसांनी नांगी टाकली मात्र सरकारी वकिलांनी खिंड लढवली;न्यायालयाने जामिन फेटाळला

बीड स्पीड न्यूज 


हजरत शहंशाह वली दर्गाह वक्फ घोटाळ्यात पोलिसांनी नांगी टाकली मात्र सरकारी वकिलांनी खिंड लढवली;न्यायालयाने जामिन फेटाळला 
____
बीड प्रतिनिधी_बीड जिल्ह्य़ातील वक्फ बोर्डाच्या ४०९ एकर जमिन बनावट दस्तावेज तयार करून सर्व्हे नंबर २२ मधिल महामार्ग  क्रमांक २११ ची जमिन बेकायदेशीर रित्या हस्तांतरण प्रकरणात पोलिसांनी कचखाऊ भुमिका घेतल्याचे दिसुन येते तर सरकारी वकीलांनी तडाखेबंद युक्तिवाद केल्यामुळे न्यायालयाने आरोपींना जामिन नाकारला. 

पोलिस तपासी अंमलदार यांनी पोलिस कोठडी नव्हे तर न्यायालयीन कोठडी मागितली 
____
एकतर तपासी अंमलदार आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी दि.१७ मार्च रोजी न्यायालयात गैरहजर राहिल्यानंतर व माहिती गुन्ह्याची माहीती नसलेले पोलिस उपनिरीक्षक बडे यांना पाठवले तर आज दि.१९ मार्च रोजी न्यायालयात केवळ गैरहजर राहिलेच नाहीत तर आरोपींना पोलीस कोठडी मागण्याऐवजी न्यायालयीन कोठडी मागितली तर आरोपींनी जामिन मागितला. 

सरकारी वकिलांनी खिंड लढवली तर पोलिस तपासी अंमलदार यांनी नांगी टाकली 
___
आज दि.१९ मार्च रोजी कोर्टात तपासी अंमलदार आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आजही गैरहजर राहुन त्यांनी केवळ काॅन्स्टेबल हजर राहुन त्यांनी आरोपींना पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडी मागत तपास पुर्ण झाल्याचे संकेत दिले. परंतु सरकारी वकील अड. श्रीमती पानसंबळ आणि बीड  जिल्हा वक्फ बोर्डाचे वकील अड.सय्यद अझहर अली यांनी खिंड लढवत जोरदार युक्तिवाद केल्याने आरोपींचा जामिन फेटाळला. 

पोलिस उपअधिक्षक पंकज कुमावत यांच्याकडे तपास द्या; निष्क्रीय खाडेंना हटवा :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
______
सक्षम तपासी आधिकारी हवा यासाठी तपास पोलिस उपअधिक्षक पंकज कुमावत यांच्याकडे देण्यात यावा तरच ईनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कारवाई होईल, गैरहजर राहुन आरोपींना सहकार्य करणारे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्याकडुन तपास काढुन घ्यावा. 

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो. नं.८१८०९२७५७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा