बीड स्पीड न्यूज
ऊसतोड कामगारांच जगणं आणि मरणं हे सगळं ऊसाच्या फडातच!
हौशी मराठी नाट्य स्पर्धेत उचल नाटकाने जिंकली रसिकांची मने
बीड / प्रतिनिधी_शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरु आहे. या स्पर्धेत सादर झालेल्या उचल या नाटकाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या नाटकातून एकंदरीत ऊसतोड कामगारांच्या जगण्यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. रसिकांनी उचल या नाटकाला भरभरून दाद दिली. महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सनी कला मंच किल्ले धारूर या संस्थने सादर केलेल्या उचल या नाटकाचे लेखक सुधीर

निकम आणि दिगदर्शक प्रमोद रामदासी यांनी नाटकातून एक व्यापक विषय मांडला आहे. या नाटकात 1950 ला मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाड्यातील बीड जिल्हा व मराठवाडा भारतात सामील झाला,शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे तसेच कुठल्याही प्रकारचा विकास न झाल्यामुळे येथील बहुतांश लोक ऊस तोडणीला जाऊ लागले आणि हळूहळू बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून उदयाला आला.ऊसतोड कामगारांचा जगणं आणि मरणं हे सगळं ऊसाच्या फडातच होऊ लागलं.त्यांची मुले सहा महिने शाळेत तर सहा महिने पाचरटात राहू लागली.बीड जिल्हा सोडून इतर ठिकाणी ऊसतोडणीसाठी गेल्यावर त्यांच्या
हालअपेष्टा त्यांच्यावर होणारा अन्याय हा वेळोवेळी राजकीय लोकांनी दाबण्याचा प्रयत्न केला आणि आजही स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानंतर त्यांच्या भावना यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही,हेच जळजळीत सत्य समाजासमोर डॉ.सुधीर निकम लिखित उचल या नाटकामधे आपणासमोर मांडले गेले आहे. तसेच ऊसतोड मजुरांच्या जीवनपद्धती त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार व त्यांची अवस्था त्याला वाचा फोडण्याचे काम उचल्या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत केले आहे या नाटकाचे दिग्दर्शन प्रमोद रामदासी यांनी केले आहे.एकंदरीत उचल या नाटकाने रसिकांच्या मनात घर करून चिंतन करण्यास भाग पडेल असेच आहे.
0 टिप्पण्या