Subscribe Us

header ads

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केले; पतीला ७ वर्षे सश्रम कारावास; अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यालायाचा निकाल

बीड स्पीड न्यूज 

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केले; पतीला ७ वर्षे सश्रम कारावास अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यालायाचा निकाल


अंबाजोगाई_ पत्नीचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात अंबाजोगाई सत्र न्यायालयाचे न्या. व्ही. के. मांडे यांनी आरोपी पतीस दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.बुशराबी रहिमखां ईस्माइल पठाण असे त्या मयत विवाहितेचे नाव आहे. लग्नानंतर पती व सासु-सासरे हे बुशराबीला तुला स्वयंपाक चांगला येत नाही, तुला काम करता येत नाही असे म्हणून सतत शिवीगाळ व मारहाण करत. ऊसतोडणी वरून गावी आल्यानंतर २०१६ मध्ये तिचा नवरा रहिमखां तिला मारहाण करून पुणे येथे निघून गेला. त्यानंतर दोन वर्षांनी परत आल्यानंतर बुशराबीचे वडील व नातेवाईकांनी मध्यस्थी करून बुशराबी हिला नांदविण्यास पाठविले. त्यानंतर दुस-या दिवशी आरोपी रहिमखां बुशराबीला लातूर येथे घेऊन गेला आणि पुन्हा वाघाळा कारखाना येथे तिला एकटीला सोडून गेला. त्यानंतर बुशराबी एकटीच साकुड येथे आली व २८ जून २०१६ रोजी सकाळी ९ वाजता तिने राहत्या घरी पत्राच्या आडुला गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी बुशरा  बीचे वडील शेख बशीर यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपासी अधिकारी एस. डी. भिकाणे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यांची साक्ष व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राहय धरून न्या. व्ही. के. मांडे यांनी रहिमखां ईस्माइल पठाण याला सात वर्षे सक्तमजूरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. शिवाजी व्ही. मुंडे यांनी काम पाहीले व त्यांना अॅड. एल. बी. फड यांनी सहकार्य केले. तसेच पोलीस पैरवी गोविंद कदम व पो.ना. शितल घुगे यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा