Subscribe Us

header ads

पिंपळनेर येथे महावितरण च्या विरोधात उपोषण

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

पिंपळनेर येथे महावितरण च्या विरोधात उपोषण 

वाकनाथपुर प्रतिनिधी-: पिंपळनेर येथे महावितरण च्या विरोधात उपोषण महावितरण कंपनीचे वेळेवर बिल भरून देखील वीज पुरवठा सुरळीत होत नाही यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.या सर्व समस्यांना कंटाळून पिंपळनेर 

येथील नागरिक.शेतकरी.आणि व्यापारी वर्ग यांनी आज दिनांक २२ एप्रिल वार शुक्रवार रोजी पिंपळनेर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर शेकडो नागरिकांनी मोर्चा कडून उपोषण सुरू केले आहे. बिले घ्या पण विद्युत पुरवठा सुरळीत करा. हवी असल्यास 

आम्ही गावकरी. शेतकरी आणि व्यापारी वर्ग आपणास हवी ती मदत करू पण वीज पुरवठा सुरळीत करा अश्या विविध मागण्या करण्यात आल्या या वेळी या भागातील नागरिक. शेतकरी. आणि व्यापारी वर्गची मोठी उपस्थीती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा