Subscribe Us

header ads

भाजप नेते मोहितकंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, रेकी करण्यासाठी आले होते मातोश्रीसमोर, शिवसेनेचा आरोप

बीड स्पीड न्यूज 


भाजप नेते मोहितकंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, रेकी करण्यासाठी आले होते मातोश्रीसमोर, शिवसेनेचा आरोप


मुंबई-:भाजप नेते मोहित कंबोजच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला आहे. कंबोज यांची गाडी मातोश्रीजवळ आली असता अनेक शिवसैनिकांनी अचानक पणे हल्ला चढवला. यावेळी त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे.दरम्यान, शिवसैनिकांचा कायद्यावर विश्वास आहे का नाही असा सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. मोहित कंबोज जर रेकी करायला आले होते, तर मुंबई पोलिस झोपले होते का, असा सवालही अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. राज्यात अराजकता असल्याचं या घटनेतून सिद्ध झाल्याचंही अतुल भातखळकर यांनी म्हटलंय.परिसराची रेकी करण्यासाठी भाजपचे नेते मोहित कंबोज हे मातोश्री बाहेर आले होते. त्यांना प्रश्न विचारले मात्र त्यांना काही सांगता आले नाही अशी माहिती उपस्थित शिवसैनिकांनी दिली आहे.

माझ्या घरी जाण्याचा तो रस्ता मोहित कंबोज

मी एका पत्रकारांच्या लग्नाला गेलो होतो. सिग्लवर गाडी थांबल्याने गाडीची गती कमी करण्यात आली होती. अचानक अनेकांनी माझ्यावर हल्ला चढवला. माझ्या घराकडे जाण्याचा तो रस्ता आहे. आणि त्यावरून मी जात असताना हातात हत्यार घेऊन अनेकांनी माझ्यावर हल्ला केला. मला रेकी करण्याचेच काम उरले आहे का असे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.

मोहित कंबोज यांनी अनेक भोंगे वाटले

मोहित कंबोज यांनी अनेक भोंगे वाटले होते. तेव्हापासून भाजप नेते मोहित कंबोज चर्चेत होते. मोहित कंबोज यांची गाडी मातोश्रीसमोरुन जात असताना शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. कलानगर सिग्नल परिसरात मोहित कंबोज यांची गाडी थांबली होती. मोहित कंबोज यांच्याकडून या परिसराची रेकी केली जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर मोहित कंबोज यांच्या गाडीवर निशाणा साधला गेलाय. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ धाव घेत मोठा अनुचित प्रकार होण्यापासून रोखलाय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा