Subscribe Us

header ads

अंबाजोगाई लातूर हायवेवर ट्रक आणि क्रुझरचा भीषण अपघात अपघातात सहा जण जागीच ठार

बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाई लातूर हायवेवर ट्रक आणि क्रुझरचा भीषण अपघात अपघातात सहा जण जागीच ठार


अंबाजोगाई प्रतिनिधी-:अंबाजोगाई येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि क्रुझर च्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच 

ठार झाले आहेत. हा अपघात अंबाजोगाई तालुक्यातील सायगावच्या खडी केंद्राजवळ घडला आहे.अंबाजोगाई लातूर हायवेवरील नंदगोपाल दूध डेअरी सायगावजवळ 

शनिवारी (दि. २३) सकाळी ट्रक-क्रुझरच्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात सहा जनांचा मृत्यु झाला 

असून घटनास्थळी रक्त आणि मांसाचा सडा दिसत आहे.मयत लातूर जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. हे सर्व जण आज सकाळी 

(राडी) या गावी कार्यक्रमाला जात असताना ट्रक आणि क्रुझरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यु झाला असून यात अद्याप 

मयताची नावे समोर आली नसून या अपघातात मृत्युंचा आकडा वाढू शकतो घटनास्थळी अंबाजोगाई पोलीस दाखल झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा