Subscribe Us

header ads

शुक्रवारी बीडमध्ये मोफत मुळव्याध तपासणी

बीड स्पीड न्यूज 



शुक्रवारी बीडमध्ये मोफत मुळव्याध तपासणी
महिलांसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची उपस्थिती
बीडच्या सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटलचा उपक्रम



बीड । प्रतिनिधी-: मुळव्याधसारख्या आजाराच्या रुग्णांसाठी बीड येथील मुळव्याध तज्ज्ञ डॉ. अमोल खेत्रे यांनी बीडमध्ये मोफत मुळव्याध तपासणी शिबीर अयोजन केले आहे. या शिबीरात  तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने पूर्णपणे मोफत तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे महिलांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ महिला डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे. हे शिबीर  बीड शहरातील जालना रोड येथील सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटल येथे शुक्रवार दि. 22 एप्रिल 2022 रोजी  होणार आहे.
तपासणी न केल्यामुळे मुळव्याध हा आजार वाढतच जातो. त्यामुळे मुळव्याध-भगंदर-फिशरचे लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटल बीडच्या वतीने मुळव्याध- भगंदर-फिशरची मोफत तपासणीसाठी शिबीराचे अयोजन  शुक्रवार दि. 22 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने तपासण्या करण्यात येणार आहे. या शिबीरातील रुग्णांना उपचारामध्ये  सवलतही देण्यात येणार  आहे. बीड शहरातील जालना रोड येथील डी.सी. लोढा कॉम्लेक्स, मंत्री बँकेच्या शेजारी असलेल्या सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटल येथे हे शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. मुळव्याध-भगंदर-फिशर याचे लक्षणे मलप्रवृत्तीच्या वेळेस किंवा नंतर रक्त पडणे, शौच्याच्या जागेवर आजुबाजुला गाठ येणे, त्यामधून चिकट स्त्रव व रक्त येणे, शौचाच्या जागी आग होणे, वेदणा होणे, टोचल्यासारखे वाटणे, शौचाच्या वेळेस मांसल गोल आकराचा भाग बाहेर येणे इत्यादी लक्षणे असल्यास त्याची तत्काळ तपासणी करुन त्यावर निदान करता येते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार बळावतो. त्यासाठी तपाणी करुन घेणे अत्यंत गरजेचे आहे. या हॉस्पिटलमध्ये गुदगत आजारांसाठी क्षारसुत्र, क्षारकर्म, आग्रिकर्म सुरक्षित आयुर्वेदिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत.  या शिबीरामध्ये फोनवरही नाव नोंदणी करण्याची सुविध्दा उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी रुग्णांनी 8600287972, 7517747972, या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे असे अवाहन डॉ. अमोल खेत्रे यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा