Subscribe Us

header ads

ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील हॉटेल व्यावसायिक तरुण जागीच ठार

बीड स्पीड न्यूज 


ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील हॉटेल व्यावसायिक तरुण जागीच ठार 

अंबाजोगाई प्रतिनिधी-: अंबाजोगाई ते बीड महामार्गावर रविवारी (दि. २५) रात्री ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील हॉटेल व्यावसायिक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला. तुषार चंद्रकांत कोपले (वय २९ वर्षे) असे या अपघातात ठार  झालेल्या तरुणाचे नाव आहे. तुषार कोपले हे हॉटेल चालक आहेत. रविवारी रात्री १० च्या सुमारास ते हॉटेल बंद करून आपल्या दुचाकीवरून अन्य एका व्यक्तीसोबत अंबाजोगाईकडे येत होते. शहरापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर एका ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले तर सोबतच व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे.त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. २५) दुपारी आडस येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा