Subscribe Us

header ads

स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुकाउपाध्यक्ष दत्तात्रय दादा भोसले यांचे पिताश्री स्वर्गीय दादा शंकर भोसले ऊर्फ बापु यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सदाशिवनगर या ठिकाणी निवासस्थानी सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम संपन्न अनेक पक्ष-पार्टीच्या मान्यवरांची उपस्थिती

बीड स्पीड न्यूज 


स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुकाउपाध्यक्ष दत्तात्रय दादा भोसले यांचे पिताश्री स्वर्गीय दादा शंकर भोसले ऊर्फ बापु यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सदाशिवनगर या ठिकाणी निवासस्थानी सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम संपन्न 

अनेक पक्ष-पार्टीच्या मान्यवरांची उपस्थिती

सदाशिवनगर(प्रतिनिधी)-:दि.२५/०४/२०२२(सोमवार)ह.भ.पअध्यात्मिक किर्तनकार अशोक महाराज काठाळे,रेडणीकर यांचे सदाशिवनगर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय दादा भोसले यांचे पिताश्री स्वर्गीय दादा शंकर भोसले ऊर्फ बापु यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सकाळी १०ते १२:०० या वेळेत सदाशिवनगर या ठिकाणी निवासस्थानी सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
”याजसाठी केला होता अट्‍टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥
आता निश्चितीनें पावलों विसांवा ।
खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें ।
नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी 
आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४||

हा अभंग किर्तनरुपी प्रस्तुत सेवेसाठी जगद्गुरु श्रीसंतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा घेतलेला होता.ह.भ.प.समाजप्रबोधनकार अशोक महाराज काठाळे, रेडणीकर यांनी अभ्यासपूर्ण व रसाळ वाणीने उपस्थित सर्व हरी-भाविकभक्तांना किर्तनाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केले तद्नंतर   स्वर्गीय दादा भोसले उर्फ बापू यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.त्यांचे भाषेवरती प्रभुत्व, अध्यात्माचा गाढा अभ्यास असल्याने अशा नामांकित कीर्तनकारांचा श्रवणासाठी दुर्मिळ योगायोग असल्याने पंचक्रोशीतील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित सर्व 

माता-भगिनी, अबालवृद्ध, तरुण, तरुणी उपस्थित होते कार्यक्रमावेळी किर्तनातून वैचारिक-मार्मिक प्रबोधन करून समाजासमोर रामायणातील श्रीराम कथा मांडून तसेच सध्याची प्रापंचिक अवस्था व त्याला जोड आध्यात्मिक दृष्टांत (उदाहरणं) देऊन लोकांना दोन तास कसे गेले हे कळले सुद्धा नाही. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भोसले कुटुंबीय व समस्त सदाशिवनगर ग्रामस्थमंडळी व पंचक्रोशीतील भजनी मंडळातील गायनाचार्य अशोक महाराज मोहिते,गायनाचार्य अजय महाराज काठाळे,मृदुंगाचार्य दत्तात्रय महाराज किसवे , पेटीमास्टर रामचंद्र महाराज पाटील यांनी सुमधुर आवाजात संगीतमय वातावरण निर्माण केले व हरीभक्तांनी साथ देऊन परिश्रम घेतले या कार्यक्रमाप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी महाराष्ट्रराज्य प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम,माजी उपसभापती 

अर्जुनसिंह मोहिते-पाटील,क.बा.पा.विद्यालय सदाशिवनगरचे माजी सभापती आनंतलाल दोशी,शिवसेना माळशिरस तालुका संघटक विरेंद्रसिंह वाघमारे,स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाउपाध्यक्ष भिमराव फुले, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवराम गायकवाड, रत्नत्रय इंग्लीश स्कूल चेअरमन प्रमोद दोशी, सदाशिवनगर माजी उपसरपंच वीरकुमार दोशी,पुरंदावडे गावचे सरपंच देविदास ढोपे,वस्ताद नारायण सालगुडे-पाटील,सदाशिवनगर माजी सरपंच तानाजी पालवे,कृती समितीचे अध्यक्ष भानुदास सालगुडे-पाटील, सदाशिवनगरचे ग्रामसेवक मा.रुपनवर भाऊसाहेब,धर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन प्रताप सालगुडे-पाटील,पुरंदावडे गावचे उपसरपंच संतोष शिंदे,वसंत ढगे,राऊत सर, सोपान जाधव,प्रज्योत ज्वेलर्सचे प्रज्योत दोशी,गुरूकृपा ज्वेलर्सचे दीपक दिक्षीत,यामान्यवरांसोबत व भाविकांनी महाप्रसादाचा व श्रवणाचा लाभ घेतला कांबळे मंडप मेडद यांनी अतिशय सुंदर आवाजात आपली सेवा चोख बजावली व किर्तनसेवेला साद घातली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा