Subscribe Us

header ads

पेट्रोल 9.5 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त; केंद्राने कमी केला अबकारी कर

बीड स्पीड न्यूज 


पेट्रोल 9.5 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त; केंद्राने कमी केला अबकारी कर


दिल्ली-: वाढत्या माहागाई दरम्यान सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे, सरकारकडून पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने करात कपात केल्याना सर्व सामान्यांना हा दिलासा मिळणार आहे, अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी ही घोषणा केली आहे.अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपयांनी आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलच्या किमतीत 7 रुपये प्रति लिटरने कमी होतील असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच यामुळे महसूलात वर्षाला सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा तोटा होणार आहे, असेही त्यांनी सांगितलेपेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींवरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या उत्पादनांवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, केंद्राने पेट्रोलवर 8 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील 6 रुपये प्रति लिटर केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोलचे दर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा