Subscribe Us

header ads

अखेर पाण्यात बुडालेल्या 'त्या' युवकाचा मृतदेह सापडला; परळीतील रेस्क्यु टिमने शोधला मृतदेह

बीड स्पीड न्यूज 

अखेर पाण्यात बुडालेल्या 'त्या' युवकाचा मृतदेह सापडला
परळीतील रेस्क्यु टिमने शोधला मृतदेह

अंबाजोगाई| प्रतिनिधी-: शहरातील क्रांतीनंतर परिसरातील खदाणीत बुडालेल्या १७ वर्षीय शेख अब्रार शेख चाँद या युवकाचा मृतदेह २४ तासानंतर सापडला. परळी येथील रेस्क्यु टिमने युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. ही दुर्घटना शुक्रवारी (२० मे) दुपारी दोन वाजता घडली होती, त्यानंतर आज शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास मृतदेह शोधण्यात आला.लाल नगर भागात राहणारा शेख अब्रार हा तरुण शुक्रवारी दुपारी वस्ती जवळ असलेल्या तलावात पोहणे शिकण्यासाठी म्हणून गेला होता. पोहण्यासाठी तलावात उतरल्यानंतर अचानक तो पाण्यात बुडाला. सदरील घटना समजताच लाल नगर विभागातील रहिवासी व या विभागातील माजी नगरसेवक त्याच्या शोधकार्यासाठी सदरील पाझर तलावात गेले. अनेकांनी तलावात उतरुन शेख अब्रार याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र नागरीकांना यात यश आले नाही. यातच जोराचा वादळी वारा व पाऊस यामुळे अडथळा निर्माण झाला आणि शोधकार्य थांबवावे लागले.सदरील घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी परळी नगर परिषदेच्या रेस्क्यु टीमला बोलावण्याचा निर्णय घेतला व रेस्क्यु टीमने शनिवारी सकाळ पासून सदरील पाझर तलावात अब्रार चे शोधकार्य सुरु केले. प्राथमिक प्रयत्न करुन ही अब्रार सापडत नसल्यामुळे यंत्राद्वारे तलावातील अनेक ठिकाणी हवेचे प्रेशर सोडुन तलावातील पाणी ढवळण्यास सुरुवात केली असता अब्रार याचा मृतदेह वर आला. अब्रारचे पार्थिव त्यांच्या घरातील मंडळीं व नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. सदरील शोधकार्य सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होते. या तलावात यापुर्वीही अनेकजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा