Subscribe Us

header ads

१७ वर्षीय युवक पाण्यात बुडुन बेपत्ता

बीड स्पीड न्यूज 


१७ वर्षीय युवक पाण्यात बुडुन बेपत्ता


अंबाजोगाई| प्रतिनिधी-: येथील क्रांतीनंतर परिसरातील खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवक पाण्यात बुडुन बेपत्ता झाला. ही दुर्घटना २० मे शुक्रवारी दुपारी दोन च्या दरम्यान घडली.अब्रार चांद शेख असे त्या युवकाचे नाव आहे.अब्रार चांद शेख (वय-१७वर्षे) हा युवक शुक्रवारी दुपारी मित्रांसोबत क्रांतीनंतर परिसरातील खदाणीत पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना तो पाण्यात बुडाला. ही माहिती समजताच या परिसरात मोठी गर्दी झाली होती. नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी संध्याकाळी या युवकाचे शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली होती. मात्र आपत्कालीन योजनेचे असलेले अपुरे साहित्य व अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शोध कार्यात अडथळा निर्माण झाला. आता शनिवारी परळी येथील रेस्क्यू पथक शेधकामी मदत करणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक