Subscribe Us

header ads

आ.क्षीरसागरांच्या मार्गदर्शनाखाली साक्षाळ-पिंप्री सोसायटीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

बीड स्पीड न्यूज 


आ.क्षीरसागरांच्या मार्गदर्शनाखाली साक्षाळ-पिंप्री सोसायटीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व



बीड (प्रतिनिधी):-तालुक्यातील व बीड मतदारसंघात येणाऱ्या साक्षाळ-पिंप्री सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षात माता शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे.साक्षाळ-पिंप्री सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, साक्षात माता शेतकरी विकास पॅनलचे १३ पैकी १० उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विष्णू काशीद, तुकाराम आर्सुळ,दशरथ क्षीरसागर, भगवान गवारे,रामा आर्सुळ, सिद्धेश्वर काशीद, रामकिसन काशीद,जमशीर शेख, संजीवनी काशीद व इंदूबाई काशीद आदी उमेदवारांनी विजय मिळविला आहे.या निवडणूकीदरम्यान उमेदवारांना निवडून आणण्यासाठी गोरख काशीद,बंडू काशीद,संतराम आर्सुळ, डॉ.बळीराम काशीद,शेख शब्बीर,त्रिंबक शेळके, तुकाराम शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले.निवडून आलेल्या उमेदवारांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा