Subscribe Us

header ads

पोलीस भरती प्रॅक्टिससाठी गेलेल्या मुलीची काही अज्ञातांनी छेड काढत मुलीला गाडी वरुन पाडल्याचा संशय! मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न!

बीड स्पीड न्यूज 


पोलीस भरती प्रॅक्टिससाठी गेलेल्या मुलीची काही अज्ञातांनी छेड काढत मुलीला गाडी वरुन पाडल्याचा संशय! मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न!

         

बीड|प्रतिनिधी-: सध्या बीड शहरात महिलांच्या असुरक्षितेचा विषय टांगणीला लागला आहे. बीड शहरातील मुली व महिला आजही असुरक्षितच असलेले चित्र सर्वत्र जिल्हाभर पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात महिलांवरील वाढते अन्याय अत्याचारांनी बीड जिल्हा एक चर्चेचा विषय बनला आहे. असाच एक प्रकार घडला आहे बीड शहरातील चऱ्हाटा फाट्यावर पोलीस भरती प्रॅक्टिस करण्यासाठी आलेल्या मुलीसोबत दोन ते तीन अज्ञाताने मुलिची छेड काढत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.दिनांक ०५/०५/२०२२२ ला पहाटे सुमारे ०५:०० वाजता ती मुलीगी चऱ्हाटा फाटा, अंकुश नगर येथील पोलीस प्रॅक्टिस ग्राउंडवरती भरती प्रॅक्टिस करण्यासाठी गेल्यानंतर अंधारात दबा धरुन बसलेले दोन - ते तिन अज्ञाताने मुलिला तु कोठुन आली कोण आहेस तुझा स्कार्फ सोड, चेहरा दाखव, म्हणत अंधाराचा फायदा घेत तिची छेड काढली. तेव्हा ते अज्ञात दोन ते तीन तरुण तिच्या सोबत काही काळे पांढरे करण्याच्या हेतुने बोलु लागले. मुलीस या अज्ञातांनी आपसात खुसुर- पुसुर चालु केल्यानंतर तिने तिथून पळण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी त्यांच्या जवळील चाकु दाखवत व फुटलेली काचेची बाटली दाखवत तु जर ईथे ओरडलीस तर तुला जिवे मारु असे धमकावु लागले. तेव्हा मुलीने त्या ठिकाणाहुन त्यांच्या तावडीतून कसाबसा पळ काढला असता आता हे लोक आपणांस जिवे मारणार या भितीने तेथुन मुलीने पळ काढला. पुढे बीड शहरा जवळील बालेपीर भागापर्यंत मुलगी तिच्या स्कुटी गाडी वरुन येत असताना ते अज्ञात तरुणाने तिचा गाडीचा पाठलाग त्यांच्या जवळील गाडीवरुन करत त्या मुलीस पाठीमागुन ओरडत होते. घाबरलेली मुलगी रोडवर कोणी नसल्याने आपल्याला आता हे अज्ञात तरुण चाकुने मारणार आता आपणांस कोण वाचणार या भितीने घाबरुन गेली होती. त्यावेळी सकाळचे पाच वाजले होते. पहाटेच्या सुमारास रोडवर कोणी नसण्याचा फायदा घेत तिचा त्या अज्ञात तरुणांने अपघात घडवुन आणला असावा? असा मोठ्या प्रमाणात संशय व्यक्त केला जात आहे.जेव्हा ही मुलगी आपला जिव वाचवत बीड शहराच्या दिशेने नगर रोड वरील बालेपीर मधील पुला पर्यंत पोहचवली तेव्हा ते अज्ञात तिचा गाडी मागे पाठलाग करत असतांनाच त्या अज्ञाताने मुलीला गाडी वरुन पाडल्याचा संशय व्यक्त होत आहे. व आपण छेड काढलेली घटना या मुलीने कोणास सांगु नये म्हणुन तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा व त्या मुलीचा घात- पात करण्याचा हेतु संशयाच्या भोवऱ्यात आहे. आज ही घटना होऊन सात दिवस उलटले असुन पोलीस प्रशासन अजुनही या प्रकरणात कसल्याचं प्रकारे ॲक्शन मोड मध्ये दिसत नसुन ते अज्ञात अपराधी या मुलीस मारुन अजुनही मोकाटच फिरत आहेत. हि घटना दाखवुन देते कि बीड शहरातील महिला व मुली आजही किती असुरक्षीतच आहेत. व पोलीसांच्या खाकीचा धाक अशा अपराध्यांमधे किती उरला आहे. सदर घटना सर्वत्र बीड मध्ये पसरता सर्वत्र परीसरात महिला व मुलींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढे पोलीस प्रशासन कसा या अपराध्यांना खाकीचा धाक दाखवणार हा चर्चेचा विषय बनला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा