Subscribe Us

header ads

अण्णाभाऊ साठे चौकात धावत्या कारने घेतला पेट

  बीड स्पीड न्यूज 


अण्णाभाऊ साठे चौकात धावत्या कारने घेतला पेट


बीड| प्रतिनिधी-: शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरातून बसस्थानकाकडे निघालेल्या कारने अचानक पेट घेतला ही घटना 12 मे रोजी सायंकाळी 8: वाजेच्या सुमारास घडली. गुरुवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कार क्र. ( एम एच 43 डी 7911) शहरातील 

अण्णाभाऊ साठे चौक परिसरातून बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जात होती. कार साठे चौकात आली असताना समोरील बोनेट खालील बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाले, त्यामुळे काही क्षणात बॅटरीसह बोनेटने पेट घेतला. आग वाढत असल्याचे लक्षात येताच चालक  सुदाम बाबासाहेब काटुळे यांनी तातडीने कार रस्त्याच्या बाजूला घेतली. या परिसरात बांधकाम सुरू असून तेथील पाणी आणून तातडीने ही आग विझवण्यात आली. वेळीच आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला. यावेळी नागरिकांची गर्दी झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा