Subscribe Us

header ads

कु. मुक्ताई रामेश्वर कोकाटे यांचे दहावी बोर्ड परीक्षेत 93.20 टक्के घेऊन घवघवीत यश

बीड स्पीड न्यूज 

कु. मुक्ताई रामेश्वर कोकाटे यांचे दहावी बोर्ड परीक्षेत 93.20 टक्के घेऊन घवघवीत यश

परळी (प्रतिनिधी)-: तालुक्यातील संगम येथील कु.मुक्ताई रामेश्वर कोकाटे यांनी औरंगाबाद विभागीय मंडळाच्या बोर्ड परीक्षेत 93.20 टक्के घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. कु. मुक्ताई कोकाटे यांचे वडील ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे हे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष असून सामाजिक कार्यकर्ते आहेत. तिची आई सौ.ज्योती कोकाटे या संगमच्या माजी सरपंच तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहेत.कु.मुक्ताई हिची आजी सौ.वत्सलाबाई कोकाटे या सुद्धा संगमच्या सरपंच होत्या. या यशाबद्दल कोकाटे परिवाराकडून व आप्तस्वकीयांना कडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोकाटे परिवार या आनंदाने भारावून गेले आहे. तिच्या या यशाबदद्दल सर्वस्तरातून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा