Subscribe Us

header ads

पत्रकार सचिन वक्ते यांच्या घरावर हल्ला प्रकरणी शाम अडागळे सह तिघां विरोधात गुन्हा

बीड स्पीड न्यूज 


पत्रकार सचिन वक्ते यांच्या घरावर हल्ला प्रकरणी शाम अडागळे सह तिघां विरोधात गुन्हा

(सिरसदेवी) दि १७ ( प्रतिनिधि ) सिरसदेवी येथील स्थानिक पत्रकार सचिन वक्ते यांच्या घरावर गावांतील गावगूंड यांनी हल्ला चढवला व या हल्यात त्यांची चुलती गंभीर जखमी झाली आहे तसेच त्यांनचा एक पुतन्या व एक भाऊ यांना देखील मारहान या गावंगूडांनी केली असल्याची घटना सिरसदेवी या ठिकाणी घडली या प्रकरणी तलवाडा पोलिसांत श्याम आडागळे सह तिन जणांविरोधात गून्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की , सिरसदेवी येथील स्थानिक पत्रकार हे सेतू कार्यलय चालवतात त्याठिकाणी मध्यधुंद अवस्थेत असलेल्या श्याम आडागळे यांने धिंगाना घातला पत्रकार सचिन वक्ते यांना शिवीगाळ केली ऐवढ्यावरच न थांबता त्यांचा पुतण्या व भाऊ यांना मारहान करूण त्यांच्या हातावर व पायावर कटरने वार केले आहेत सदर घटनेची तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर उपचार करण्यासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांना पाठवले त्यानंतर श्याम आडागळे व यांच्यासह तिन लोकांनी मिळून पत्रकार सचिन वक्ते यांच्या घरी जाऊन त्यांच्या चुलतीला मारहान केली व त्यांच्या गळ्यातील दागिने , व विस हजार रूपये गळ्याला चाकू लावून घेतले व त्यांचा विनयभंग केला असल्याची तक्रार त्यांनी तलवाडा पोलिसांत दिली असुन त्यांच्या फियार्दीवरूण श्याम नागूराव आडागळे  सह तिन लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास तलवाडा पोलिस करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा