Subscribe Us

header ads

कारला येथील दहावी शालांत परीक्षेत राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश.

बीड स्पीड न्यूज 


नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- प्रकाश
कारलेकर 

कारला येथील दहावी शालांत परीक्षेत राजर्षी शाहू माध्यमिक  विद्यालयाचे घवघवीत यश.



उमरी ( दि.१८) मौजे कारला येथील गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड संचलित राजर्षी शाहू माध्यमिक  विद्यालयाने प्रतिवर्षाप्रमाणे शालांत परीक्षेत नेहमीच  कारला, कळगाव  गावातील यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून शाळेचा मार्च २०२२ शालांत परीक्षेत शाळेचा  निकाल १७ जून रोजी लागला असून शाळेचा  निकाल ९६.६६% टक्के लागला आहे. शालांत परीक्षेला शाळेतून एकूण 30 विद्यार्थ्यांपैकी 30 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती,त्यापैकी एकूण ३०विद्यार्थी पैकी 29 उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांपैकी २६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून एकूण ३ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत तर १५ विद्यार्थी ग्रेड 1श्रेणीत  आहेत. संपूर्ण शाळेतून सर्वप्रथम  मयूर सुधाकर धुतुरे ८६.६०% टक्के गुण घेऊन उत्तीर्ण,  सर्वद्वितीय कु. ऋषाली उत्तम वाघमारे  ८४.४०% टक्के गुण घेऊन उत्तीर्ण तर  सर्वंतृतीय कु.अस्मिता शंकर  कदम  ही ८३.४०% टक्के गुण घेऊन  उत्तीर्ण झाली आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड संचलित राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालयाचे  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष.देवडे विजयराव दिगंबर, राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालयाचे   मुख्याध्यापीका सौ. बोटलावार  एस. बी. शाळेतील सर्व शिक्षक  मुंडकर व्ही. एम. जाधव  व्ही. जी. राठोड  वाय. डी व शिक्षकेत्तर, कर्मचारी, सेवक राठोड, पवळे,यरकलवाड क्लर्क भिसे,आदी जणांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा