Subscribe Us

header ads

बीडमध्ये शाहीरी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद; नागरिकांनी शाहीरी महोत्सवाचा आनंद घ्यावा: मंत्री अमित देशमुख

बीड स्पीड न्यूज 


बीडमध्ये शाहीरी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद; नागरिकांनी शाहीरी महोत्सवाचा आनंद घ्यावा: मंत्री अमित देशमुख



बीड / प्रतिनिधी-: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांपैकी शाहिरी महोत्सव; या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील शाहीरी महोत्सव बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शुक्रवार दि. 17 ते 19 जून या कालावधीत सायंकाळी ५ ते १०  या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे. नागरिकांनी या शाहीरी महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे या शाहीरी महोत्सवाला शुक्रवार (दि.१७) रोजी सुरुवात झाली आहे. या या शाहीरी महोत्सवाचे उदघाटन जेष्ठ साहित्यिक डॉ. सतिष साळुंके,सहसंचालक सांस्कृतिक कार्य संचालनालयचे श्रीराम पांडे, डॉ. सुधीर निकम, कार्यक्रम अधिकारी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे  संदीप बलखंडे, शाहीर सीमा पाटील, शाहीर सुरेश जाधव, शाहीर राजा कांबळे, वामन माळी,डॉ.संतोष वारे,प्रवीण वडमारे, मुकुंद धुताडमल, दैनिक पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनिल डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शाहीरी महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.महाराष्ट्रातील वीरांचा व थोरांचा क्रांती  प्रवास या महोत्सवातून सादर करण्यात आला. लोककलेतील एक महत्त्वाचा कलाप्रकार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या; शाहिरी या कला प्रकाराचे जतन- संवर्धन व्हावे आणि युवा शाहीर निर्माण व्हावेत यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात शाहिरी पोवाडा या बरोबरच इतर लोककलांचे हे सादरीकरण होणार आहे. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत शाहिरी कला फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. ग्रामीण  भागातील रसिक प्रेक्षकांचे आजही या कलेच्या माध्यमातून  मनोरंजन  होत असते.आधुनिक युगात लोप पावत चाललेल्या लोककलांचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने तसेच समृद्ध लोककलेला व लोककलावंतांना  हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी हा  शाहीरी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. दम्यान सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव पार पडतो आहे.तरी या महोत्सवाचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री.बिभिषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.



असा होणार समारोप

रविवार दि. 19 जून 2022 रोजी शाहिरी कला महोत्सव सांगता समारोह  होईल. या समारोह प्रसंगी सयप्पा बंडगर आणि सहकलाकार, सातारा हे धनगरी गजनृत्य सादर करतील तर शाहीर रविराज भद्रे, शाहिरा अनिता खरात, शाहीर विष्णु शिंदे हे राणी लक्ष्मीबाई, महात्मा फुले यांचे जीवनकार्य व समाजप्रबोधनपर पोवाडा आणि लोकगीते सादर करणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा