Subscribe Us

header ads

अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

बीड स्पीड न्यूज 


अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

गोरगरिबांना अन्नदानाचे वाटप, वृक्षारोपण व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण

परळी वैजनाथ/ प्रतिनिधी-:.अ.भा. वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या वतीने औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहनजी आव्हाड साहेब यांचा वाढदिवस आज रविवार दिनांक 12 जून रोजी परळी शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून आज सकाळी प्रती  वैद्यनाथास प्रार्थना  अभिषक मोहनजी आव्हाड साहेबांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली तसेच पायऱ्या वरील गोरगरीब लोकांना अन्नदान वाटप करण्यात आले तसेच होतकरू 

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहनजी आव्हाड साहेब यांचा  वाढदिवसा   उत्साहत साजरा अ.भा. वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या पुढाकारातून सकाळी ९  वाजता बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैजनाथ मंदिरात मोहनजी आव्हाड साहेबांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. यानंतर वैजनाथ मंदिर पायऱ्या वरील गरीब लोकांना अनुदानाचे वाटप करण्यात आले. परळी शहरातील कन्हैया वारकरी शिक्षण संस्था येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले.  कार्यक्रमास कन्हैया वारकरी शिक्षण संस्थेत  ह भ प गोविंद महाराज मुंडे, पत्रकार शेख 

मुकरम, बालाजी ढगे,ह.भ.प.आशोक महाराज कराळे,अविनाश महाराज शिंदे,दत्ता महाराज गडदे,राजेभाऊ महाराज मुंडे, एजाज भाई यांच्यासह विद्यार्थी पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी कोकाटे महाराज यांनी बोलतांना म्हणालेकी आव्हाड साहेब हे एक मोठे अधिकारी आसुनही त्यांना त्या पदाचा गर्व नाही ते नेहमी प्रत्येक कर्मचाऱ्यांना आपलस करतात सन्मानाने आदर करतात प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतात परळीला आल्यापासून औष्णिक विद्युत केंद्रात प्रत्येक कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण आव्हाड साहेबांनी निर्माण केले गोरगरीबांना सदैव सहकार्य करतात त्यांना त्याची जाणीव आहे म्हणूनच साहेब नेहमी सर्वसामान्य माणसा प्रमाने वागतात म्हणूनच गेल्या वर्षी व याही वर्षी देखील अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने मोहनजी आव्हाड साहेबांचा उत्साहत वाढदिवस साजरा कोकाटे महाराजांनी साजरा केला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा