Subscribe Us

header ads

आज वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी च्या वतीने अंबाजोगाई नगर परिषदला कचरा,व शिळे घाण पाणी भेट देण्यात आले

बीड स्पीड न्यूज 

अंबाजोगाई प्रतिनिधी शेख फिरोज 


आज वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी च्या वतीने अंबाजोगाई नगर परिषदला कचरा,व शिळे घाण पाणी भेट  देण्यात आले

अंबाजोगाई प्रतिनिधी-: आज वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अंबाजोगाई शहराच्या नगर परिषद अंबाजोगाईस कचरा,व शिळे घाण पाणी भेट देण्यात आले. अंबाजोगाई नगर परिषद च्या गलथान कारभार व चुकीच्या नियोजनामुळे अंबाजोगाई शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अंबाजोगाई शहरात पावसाळ्यापूर्वी मोठे नाले सफाई होणे गरजेचे असताना. शहरातील नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे अंबाजोगाई शहरातील छोट्या मोठ्या नाल्या तुंबून, रसत्यावर घाण पाणी  वाहत आहेत.ज्यामुळे सर्वत्र दुर्गंधीयुक्त परिसर झालेला आहे.यापूर्वी या विषयाला अनुसरून वंचित बहुजन आघाडी,राष्ट्रीय काँग्रेस, व इतर संघटना व पक्षाच्या च्या वतीने अनेक निवेदन देण्यात आले आहेत. परंतु मुजोर  कामचुकार प्रशासक जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो. हे कोणाच्या आशीर्वादाने हा प्रश्न अंबाजोगाईतील नागरिकांना पडलेला आहे. त्यामुळेच आम्ही अंबाजोगाई शहरातील जनतेच्या वतीने आज नगर परिषद अंबाजोगाई प्रशासनाला शहरातील कचरा व शिळे घाण पाणी भेट देन्यात आले.यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आसिफोद्दिन खतीब (बाबा), काँग्रेस चे शहर कार्यअध्यक्ष  संजय काळे, काँग्रेस चे शहर उपअध्यक्ष  दयानंद कांबळे, वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष गोविंद मस्के, वंचित चे शहर महासचिव नितीन सरवदे, वंचितचे जिल्हा संघटक परमेश्वर जोगदंड, वंचीतचे तालुका प्रसिध्दी प्रमुख सतिश सोनवणे, वंचितचे तालुका संघटक लखन बलाढे, वंचित बहुजन आघाडी चे शहर प्रवक्ते उमेश शिंदे, तसेच वंचित बहुजन आघाडी चे भगवान वाघमारे, साहेबराव सोनवणे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते, तसेच राष्ट्रीय काँग्रेस चे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा