Subscribe Us

header ads

एम.एम.वाय.पी. संघटनेच्या वतीने मोहम्मद पैगंबर विषयी आपत्तिजनक टिप्पणी करणार्या नुपूर शर्मावर कारवाईची मागणी...

बीड स्पीड न्यूज 

एम.एम.वाय.पी. संघटनेच्या वतीने मोहम्मद पैगंबर विषयी आपत्तिजनक टिप्पणी करणार्या नुपूर शर्मावर कारवाईची मागणी...


बदनापुर प्रतिनिधी :- महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या वतीने पोलिस निरीक्षक बदनापूर यांना  निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की नुपूर शर्मा व टाईम्स नऊ या टि.व्ही.चैनलवर नुपूर शर्मा आणि  नाविका कुमार सोबत टि.व्ही.शोमध्ये  यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर व इस्लाम धर्मा विषयी अपमानास्पद व निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल सर्व जगातील मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर व मुस्लिम धर्माबद्दल शिवीगाळ व आपत्तीजनक टिप्पणी करुन मोहम्मद पैगंबर व सर्व मुस्लिम बांधवांचा अपमान केला.यामुळे सर्व मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.नुपूर शर्मा यांनी जाणीवपुर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी व  सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केला.असे वक्तव्य करून समाजामध्ये दुही निर्माण करणार्या समाजकंटकावरती माहिती तंत्रज्ञान तसेच अन्य गंभीर कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदन कर्ते मराठवाडा अध्यक्ष शेख अजहर बदनापूरकर , जिल्हाध्यक्ष हाफिज हारुन पठाण, जिल्हा उपाध्यक्ष अफरोज बेग, तालुकाध्यक्ष शेख अगबर सांडु,मुफ्ती समीर, कॉंग्रेस शहर अथ्यक्ष जावेद बागवान,अनवर अतार,शे,रीयाज,शे,राजु, जावेद बेग, सय्यद सीकंदर,सय्यद भिकंन,  मिर्झा मुस्तफा,कलीम बेग,हाफिज जावेद पठाण, शेख युनुस, जावेद शाहा, सय्यद,परवेज पठाण, इम्रान पटेल, बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा