Subscribe Us

header ads

प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 


प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या



बीड|प्रतिनिधी-: शहरातील पेठ बीड हद्दीत माहेरी एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाला १६ जून रोजी वेगळे वळण मिळाले. विवाहितेने तिच्या प्रियकराच्या त्रासास कंटाळून हे पाऊल उचलल्याचे समोर आले. यावरून त्याच्यावर पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद झाला.सुमित्रा मंगळ डुकरे (२४, रा. हनुमाननगर, बार्शी नाका, बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. तिची आई सुशीला गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार, दोन वर्षांपासून सुमित्रा पतीला सोडून माहेरी राहत होती. गेल्या सहा महिन्यांपासून तिचे सोमेश्वर उर्फ आब्बू एलप्पा शिंदे यांच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तो नेहमी सुमित्राला भेटण्यासाठी येत असे, परंतु मागील काही दिवसांपासून सोमेश्वरने सुमित्राला टाळण्यास सुरुवात केलीहोती. तो मोबाइलवरून मानसिक त्रास देत छळवणूक करत असल्याने, जगावे वाटत नसल्याचे सुमित्राने आईला सांगितले होते. सोमेश्वर शिंदे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पेठ बीड ठाण्यात नोंद झाला. तपास उपनिरीक्षक राजेंद्र बनकर करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा