Subscribe Us

header ads

कुक्कडगाव सबस्टेशन येथील विद्युत पुरवठयाने नागरिक त्रस्त

बीड स्पीड न्यूज 


कुक्कडगाव सबस्टेशन येथील विद्युत पुरवठयाने नागरिक त्रस्त

वाकनाथपुर प्रतिनिधी-: बीड तालुक्यातील मौजे कुक्कडगाव येथे या सर्व भागात ११ के व्ही विद्युत पुरवठा करणारे सब स्टेशन आहे. परंतु या सब स्टेशन वरून विद्युत पुरवठा कधी सुरळीत नसतो आता काही दिवसापूर्वी पाऊसाळा सुरू झाला आणि आता पर्यंत या भागात तीन वेळेस पाऊस झाला पाऊस झाला की पाऊस बंद होऊन परत दुसरा पाऊस येण्याची वेळ येते तेव्हा लाईट चालु होते. पहिला पाऊस झाला तेव्हा कमीत कमी वीस तास या भागातील लाईट बंद होती.दुसरा पाऊस झाला तेव्हा सुमारे पंधरा ते सोळा तास लाईट बंद होती. आणि रात्री पाऊस झाला तेव्हा सुमारे बारा तास लाईट बंद होती. महावितरण कर्मचाऱ्यांना फोन केला तर फॉल्ट आहे असे सांगितले जाते प्रत्येक पाऊसात जर अशीच लाईट बंद राहिली तर वीज बिले भरायची कशी अशी या भागात चर्चा आहे. महावितरण कंपनीने पाऊस बंद असताना कोठे फॉल्ट होते. ते दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी होत आहे कारण रोज रोज लाईट जाण्याने नागरिक खुप त्रस्त झाले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा