Subscribe Us

header ads

नियोजित वेळेत बंद असणाऱ्या तसेच शासनाच्या नियमाचे अनुपालन न करणाऱ्या स्वस्तधान्य दुकानांवर कारवाई करा

बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाई प्रतिनिधी( शेख फेरोज) 7020475287


नियोजित वेळेत बंद असणाऱ्या तसेच शासनाच्या नियमाचे अनुपालन न करणाऱ्या स्वस्तधान्य दुकानांवर कारवाई करा



अंबाजोगाई|प्रतिनिधी-: पुरोगामी पत्रकार संघाच्या अंबेजोगाई शाखेने अचानक जवळगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानाची चौकशी केली असता स्वस्त धान्य दुकानारांना शासनाने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवत दुकान चालू असल्याचे आढळले. तिथे जाऊन तलाठी व पुरवठा अधिकारी यांना संपर्क केला असता कोणीही फोन उचलला नाही. सदर दुकान सिल करून, २१ एप्रिल रोजी च्या तहसीलदार यांच्या स्वस्त धान्य दुकानांचा अनुपालन अहवाल सादर न करणाऱ्या तलाठी बिराजदार यांच्यावर ही दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी पुरोगामी पत्रकार संघ शाखा अंबाजोगाई च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष अहमद पठाण, उपाध्यक्ष सय्यद एस एम , कार्याध्यक्ष प्रसेनजित आचार्य, सचिव फैजान मोहम्मद, शहर अध्यक्ष अजय गोरे, तालुका संघटक शेख फेरोज उपस्थित होते.

पुरोगामी पत्रकार संघ, अंबाजोगाई शाखेकडून तहीलदारांसह पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा...

जवळगाव येथील तलाठी बिराजदार व स्वस्त धान्य दुकनदारावर कारवाई करण्याची मागणी...

सात दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास बांगड्या व साडी चोळी भेट देत तीव्र आंदोलनाचा इशारा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा