Subscribe Us

header ads

कुक्कड गाव येथे अवैद्य पणे वाळू घेऊन जाणारा टीप्पर आदळल्याने ३३ केव्हीचा विजेचा पोल पडला सहा ते सात गावे अंधारात

बीड स्पीड न्यूज 

कुक्कड गाव येथे अवैद्य पणे वाळू घेऊन जाणारा टीप्पर आदळल्याने ३३ केव्हीचा विजेचा पोल पडला सहा ते सात गावे अंधारात


वाकनाथपुर प्रतिनिधी-:पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रात्रं न दिवस वाळू उपसा चालु आहे. कोणालाही कशाच धाक राहिलेला नाही या भागातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करून देखील वाळू उपसा बंद होत नाही. या वाळू मुळे कोणत्याही रोड वर डांबर राहिले नाही. आज अशीच घटना घडली आहे वाळू घेऊन जाणारे टिप्पर कुक्कडगाव शिवारात टिप्पर पाठीमागे घेतांना एका ३३ केव्हीचा विजेच्या खांबाला धडकले धडक लागताच विजेचा खांब खाली कोसळला विजेचा खांब कोसळण्याने विजेच्या सर्व तारा तुटल्या तारा तुटल्या कारणाने आज या भागातील सहा ते सात गावे अंधारात आहेत. तारा तुटल्याने महावितरणचे ही मोठे नुकसान झाले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा