Subscribe Us

header ads

बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; गेवराई येथून महिला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

बीड स्पीड न्यूज 

बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; गेवराई येथून महिला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात


बीड| प्रतिनिधी-: पहिल्या तीन मुली असलेल्या महिलेचा चौथ्यांदा गर्भ राहिल्यानंतर महिलेचा रविवारी मृत्यू झाला होता. यात शवविच्छेदन अहवालावरून हा अवैध गर्भपात असल्याचे समोर आले होते. मंगळवारी सकाळी पोलिसांनी पतीसह नातेवाईकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर दुपारी  गेवराई येथून एका महिला डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. बीड पोलिस या महिला डॉक्टरला घेऊन बीडकडे रवाना झाले आहे.सीताबाई उर्फ शीतल गणेश गाडे (वय ३०, रा. बक्करवाडी, ता. बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. शीतल या ऊसतोड मजूर असून, त्यांना अगोदरच तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या. परंतु, रविवारी अचानक त्यांना रक्तस्त्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यात संशय आल्याने पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून शवविच्छेदन करण्यात आले होते. यात हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी सकाळीच मयताच्या नातेवाइकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत चौकशी केली. त्यांनी याची कबुली दिली. त्यानंतर त्या सर्वांना घेऊन पोलिस ज्यांनी गर्भपात केला, त्या ठिकाणी पोहचले. गेवराई तालुक्यातील एका महिला डॉक्टरला पोलिसांनी दुपारी 2:30 वाजता ताब्यात आहे. यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. तसेच गर्भपात कोठे झाला आणि काढलेला गर्भाची कोठे विल्हेवाट लावली, याचा कसून शोध पोलिस घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा