Subscribe Us

header ads

अंतरवन पिंप्री तांडा येथे सर्प मित्राने दिले सापाला जीवनदान

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

अंतरवन पिंप्री तांडा येथे सर्प मित्राने दिले सापाला जीवनदान



वाकनाथपुर प्रतिनिधी-:साप म्हटल की चांगल्या चांगल्याना घाम फुटतो अनेक जन साप मारण्यासाठी काठ्या घेऊन येतात आणि सापाला मारून टाकतात पण बीड पासुन जवळ असणारे गाव मौजे अंतरवन पिंप्री तांडा येथे आज सकाळी ११ वाजण्याच्या आसपास रोड च्या बाजूला धामण जातीचे दोन साप गावकऱ्यांच्या नजरेस पडले सर्व गावकरी जमा झाले आणि बीड येथील 

सर्प मित्रांना फोन करण्यात आला. लगेच बीड येथील सर्प मित्र दीपक वाघमारे, जयदीप ओव्हाळ, अजय डाके, आणि विशाल मुसळे, यांनी घटनास्थळी धाव घेतली तो पर्यंत गावकऱ्यांना बघुन दोन्ही साप ऐका बिळात गेले. सर्व सर्प मित्रांनी मिळून बीळ खोदून धामण जातीचा एक साप पकडला या सापाची उंची सुमारे पाच ते सहा फूट इतकी होती. दुसरा साप पकडण्यासाठी खूप मेहनत घेतली परंतु साप लवकर मिळून आला नाही. तरी सर्व सर्प मित्र साप शोधण्याचे काम करत होते. एक साप पकडला तेव्हा सर्व गावकरी सर्व सर्प मित्रांचे कौतुक करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा