Subscribe Us

header ads

राक्षस भुवन ( देवीचे) ते कुर्ला एक महिन्यापूर्वी झालेल्या डांबरी रस्त्याला पडले खड्डे

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

राक्षस भुवन ( देवीचे) ते कुर्ला एक महिन्यापूर्वी झालेल्या डांबरी रस्त्याला पडले खड्डे





वाकनाथपुर प्रतिनिधी-: बीड तालुक्यातील ग्रामीण भागात सहजा सहजी विकास होत नाही कोठे जाण्यासाठी नीट रस्ते नसतात आणि रस्ते मंजूर झाले तरी गुत्तेदार काम बरोबर करत नाहीत. थातुर मतुर काम करून बिले उचलतात अश्याच प्रकारे बीड तालुक्यातील 

मौजे राक्षस भुवन (देवीचे) ते कुर्ला हा पाच किलोमीटरचा रस्ता काही महिन्यांपूर्वी मंजूर झाला आणि या कामाला सुरुवात देखील झाली राक्षस भुवन (देवीचे) या बाजूने कामाला सुरुवात करून हा रस्ता भाटसांगवी पर्यंत पूर्ण ही झाला. पण हा रस्ता एका महिन्यात जागोजागी खचून 

गेला एका महिन्यात नवीन रस्ता जर खचत असेल तर काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे समजते असेच काम जर गुत्तेदार करत गेले तर प्रत्येक वर्षी रस्ता निविन बनवावा लागेल तरी या कामाची पाहणी करून योग्य कारवाही करण्यात यावी अशी मागणी गावकरी करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा