Subscribe Us

header ads

बीड वंचित बहुजन आघाडीची शहर कार्यकारिणी जाहिर

बीड स्पीड न्यूज 


बीड वंचित बहुजन आघाडीची शहर कार्यकारिणी जाहिर  वंचितच्या बीड शहराध्यक्ष पदी लखन जोगदंड,महासचिव संदीप जाधव, उपाध्यक्ष मोहम्मद मोईजोद्दीन, प्रसिद्धी प्रमुख पदी राजेशकुमार जोगदंड,सहसचिव शेख मुबीन यांची नियुक्ती  


बीड (प्रतिनिधी ) दि.११ वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या बीड शहर पश्चिम विभागाच्या शहर कार्यकारिणीची नियुक्ती घोषणा दि . ०९/०७/२०२२ रोजी श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार पत्राद्वारे प्रदेशाध्यक्ष रेखाताई  ठाकुर यांनी केली आहे. शहराध्यक्षपदी लखन जोगदंड, उपाध्यक्ष देवानंद वाघमारे,मोहम्मद मोईजोद्दी महासचिव संदीप जाधव,प्रसिद्धी प्रमुख राजेशकुमार योगेश शिंदे, संघटक शेख मुबीन शेख मोईन सह सचिव यांची निवड करण्यात आले आहे. विद्यार्थी दशेपासुन सामाजिक कार्याची ओढ व सन २००० या वर्षी  भारिप बहुजन महासंघाचे शहर सरचिटणीस पदापासून ते बीड तालुकाप्रमुख या पदापर्यंत पक्षाचे कार्य निस्वार्थीपणे करणारे भाई राजेशकुमार जोगदंड यांनी सनदशीर व लोकशाही मार्गाने  अनेक  सामाजिक आंदोलने  करून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य  केले आहे ‌‌. ओबीसी आरक्षण,अनुकंप धारक नोकरी,बेकायदेशीर मोबाईल टॉवर,राज्य परीवहन मंडळ नोकर भरती या विविध विषयांवर आंदोलने केली आहेत. या कार्यकारिणी मध्ये पक्षनिष्ठा व वंचित ची खांद्यावर धुरा घेऊन काम करण्याची संधी  देण्यात आली  त्यांना पुढील कार्यालयास शुभेच्छा देण्यात  येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा