Subscribe Us

header ads

बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

बीड स्पीड न्यूज 

बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न


बीड|प्रतिनिधी-: बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला.बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या पोलीस चौकीच्या समोर या तरुणांने विषारी औषध प्राशन केले आहे. प्राथमिक माहितीनुसार समाधान शिवाजी धिवार असे त्या तरुणाचे नाव असून तो केज तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तर समाधान याने नेमके विषारी औषध प्राशन का केले? हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान घटनेची माहिती कळताच जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी स्वतः घटनास्थळी येत संबंधित तरुणाला एका रिक्षामध्ये बसवून त्याच्यासोबत पोलिसांना पाठविले. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या विष प्राशन केलेल्या 
तरुणाचे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा