Subscribe Us

header ads

पुणे येथे "कटिबंध" चित्रपट प्रसारणास उत्स्फुर्त प्रतिसाद निर्माता संजय जाधव यांना "सुवर्णकार महारत्न पुरस्कार"

बीड स्पीड न्यूज 

(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पत्रकार ,पुणे)


पुणे येथे "कटिबंध" चित्रपट प्रसारणास उत्स्फुर्त प्रतिसाद
निर्माता संजय जाधव यांना "सुवर्णकार महारत्न पुरस्कार"



पुणेः संत नरहरी महाराज यांच्या जीवनावर आधारीत "कटिबंध" या चित्रपटाचे नुकतेच पुणे येथे उत्साहात प्रसारण संपन्न झाले.सुवर्णकार समाजात या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल निर्माता संजय जाधव यांना 'एसएनएस फाउंडेशन'च्या वतीने "सुवर्णकार महारत्न पुरस्कार"प्रदान करण्यात आला.सर्वशाखीय सुवर्णकार समाजाच्या वतीने दि.२९जुन रोजी 'गणेश कला क्रीडा मंच',पुणे येथे "कटिबंध"या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजनात पुणे येथील  अहिर सुवर्णकार समाज,,अखिल वैश्य सुवर्णकार संघ,माळवी सोनार संस्था,श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळ,विश्वकर्मा पांचाळ सोनार(सुवर्णकार)समाज, दैवज्ञ सोनार एकता संघ आदी संस्था,संघटना,उद्योजक आदींचा सहआयोजक म्हणुन सहभाग होता.तर अनेकांनी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष  आवश्यक त्या ठिकाणी सहकार्य केले.या चित्रपटाच्या प्रसारण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मेजर जनरल विजय पिंगळे,सौ.नीता पिंगळे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर मान्यवर सेवानिवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे,सेवानिवृत्त आयकर अधिकारी तथा ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार,साहित्यिक वि.दा.पिंगळे,मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, 'आपलं घर' चे संस्थापक विजय फळणीकर,सेवानिवृत्त संचालक वनविभाग मोहनराव खेडकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती उर्मिलाताई पिंगळे ,उद्योजिका सौ.पिनल वानखेडे आदी मान्यवर  होते.या मान्यवरांचा परिचय सौ.शुभांगी निफाडकर यांनी करुन दिला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. संत नरहरी महाराज जीवन चरित्र व माहिती 'कटिबंध'या चित्रपटातुन देण्याचा चांगला प्रयत्न केला असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन याप्रसंगी व्यक्त केले.
सुवर्णकार महारत्न पुरस्कार सुवर्णकार समाजात संत नरहरी महाराज जीवन चरित्राचा अभ्यास करुन उत्कृष्ट चित्रपट निर्मिती केल्याबद्दल 'खुशी प्रोडक्शन निर्मित "कटिबंध"या चित्रपटाचे निर्माता संजय जाधव यांच्या कार्याचा गौरव 'एस.एन,एस.फाउंडेशन चे अध्यक्ष चंद्रकांत पाटणकर यांनी करुन त्यांना या फाउंडेशन च्या वतीने "सुवर्णकार महारत्न पुरस्कार "प्रदान करण्यात आला याप्रसंगी फाउंडेशन च्या ट्रस्टीसह चंद्रकांत पाटणकर,अरुण कुलथे,चंद्रकांत दिक्षित,पांडुरंग फाकटकर,कुमारी मृणाल पाटणकर यांची उपस्थिती होती.पुरस्कार प्राप्त संजय जाधव यांचे मान्यवरांनी कौतुक करुन अभिनंदन केले.

सर्व स्तरांतुन उपस्थिती


'कटिवंध"चित्रपट प्रसारण कार्यक्रमास सर्व स्तरातुन उपस्थिती होती.त्यामध्ये स्त्री शक्ती फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.अर्चना सोनार,प्रा.डाॕ.ईश्वर सोनार,कलाकृती फाउंडेशन च्या सौ.संगीता पिंगळे ,संत नरहरी महाराज मंदिर ,हडपसरचे सचिव भालचंद्र टेंभुर्णीकर ,सामाजिक कार्यकर्ते मनोज भावेकर, लक्ष्मण पाटणकर, गजानन शेरेकर,अजय मानोरे,निलेश घाटोळे,सौ.सुनंदाताई बानुबाकुडे,मधुकर टोंपे,नामदेव सुवर्णकार,प्रसाद पोतदार,खुशी प्रोडक्शनची टीम,सेलिब्रेटी,सौ.सुनिता जाधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रामुख्याने या कार्यक्रमास 'कटिबंध'या चित्रपटात संत नरहरी महाराज यांची भुमिका साकारणारे मुकेश गायकवाड ,व अच्युतरावांची भुमिका करणारे गुरुनाथ कुलकर्णी या कलावंताचीही विशेष उपस्थिती होती.तसेच चंद्रपुर सोनार समाज बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष प्रफुल चावरे व पदाधिकारी गजानन उरकुडे,सोनु चावरे  व रुग्वेद न्युज चॕनेल,नागपुरचे संचालक दिनेश येवले यांनीही आपली उपस्थिती दर्शविली.सभागृहातील सर्व प्रेक्षक ,मान्यवर,सेलिब्रेटी यांचे चित्रपट प्रचार-प्रसारक व पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी शब्दसुमनाने स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा