Subscribe Us

header ads

महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री अनुसूचित जातीच्या आमदारांनाच करण्यात यावे मुख्यमंत्र्यांकडे व उप- मुख्यमंत्र्यांकडे अनिल तुरुकमारे यांची मागणी.

बीड स्पीड न्यूज 


महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री अनुसूचित जातीच्या आमदारांनाच करण्यात यावे मुख्यमंत्र्यांकडे व उप- मुख्यमंत्र्यांकडे अनिल तुरुकमारे यांची मागणी.


बीड|प्रतिनिधि-: महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री राज्यमंत्री पद हे मागासवर्गीयांना विकासासाठी, उन्नतिसाठी न्याय देणार पद आहे व या पदाला अनुसूचित जातीचा आमदारच न्याय देऊ शकतो त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी अनुसूचित जातीचा आमदार यांना समाजकल्याण मंत्री राज्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा सरचिटणीस अनिल तुरुकमारे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री राज्यमंत्री हे ज्यांना मागासवर्गीय समाजाबाबत त्यांच्या समस्याबाबत देणे घेणे नाही त्यांना खाते देण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेकडो कोटि रूपयांचे बजेट मागासवर्गीय यांच्या विकासासाठी न वापरता इतत्र दुसऱ्या कामासाठी वळवन्यात आले होते. तसेच समाजकल्याणच्या अनेक वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजना बंद करण्यात आल्या आहेत. मागासवर्गीयांच्या कोणत्याच महामंडळा मार्फत नवीन कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आलेली नाहीत. तसेच मंजूर असलेल्या जुन्या कर्ज प्रकारनालाही निधि उपलब्ध करुन देण्यात आला नाही. विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेचे अनुदान अद्याप पर्यन्त त्यांच्या खात्यावर जमा नाहीत. दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजना तसेच बचत गटांना दिल्या जाणाऱ्या विविध योजना विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ति योजना बार्टीच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्याचे प्रश्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैयक्तिक विहीर स्वावलंबन कृषी योजना त्यात भूजल अट , नवीन औद्योगिक संस्था परवानगी बंद अश्या अनेक योजना पासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजाला विकासा पासून दूर ठेवण्यात आले तसेच कोटयावधि रूपयांचे बजेट इतत्र वळविन्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनाच्या नावाखाली मागासवर्गीय वस्तीत रस्ता नाले पथदिवे मंजूर करुन महाराष्ट्रात राष्ट्रवादी ने गुत्तेदारी च्या नावाखाली कार्यकर्ते श्रीमंत करण्याचे काम केले आहे. या योजनेचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. सामाजिक विकास योजनेचा निधि नियंमबाह्य पद्धतीने वाटप करण्यात आलेला आहे. समाजकल्याण खात्याचा खरा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. बार्टीच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली कोटयावधी रूपयांचा भ्रष्टाचार तक्रार असलेल्या संस्थेना अनुदान, नियमबाह्य आश्रम शाळेंना मंजूरी, तक्रारी असलेल्या संस्थेच्या शाळा सुरु अश्या प्रकारे समाजकल्याण खात्याचा गैरवापर करुन समाजकल्याण खाते बदनाम करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस यांनी महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री राज्यमंत्री पद अनुसूचित जातीच्या आमदाराला दिल्यास सामाजिक भान ठेऊन ते समाजाला न्याय देऊ शकतील तरी माझ्या निवेदनाची दखल घेण्यात यावी अशी मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टिचे मराठवाडा सरचिटणीस अनिल तुरुकमारे यांनी मेल करुन निवेदनद्वारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा