Subscribe Us

header ads

क्लासिक ट्रेडर्स नावाच्या होलसेल किराणा दुकानावर अन्न प्रशासनाचा छापा 50 हजार रुपयांचा गुटखा जप्त

बीड स्पीड न्यूज 


क्लासिक ट्रेडर्स नावाच्या होलसेल किराणा दुकानावर अन्न प्रशासनाचा छापा 50 हजार रुपयांचा गुटखा जप्त


बीड | प्रतिनिधी -: बीड जिल्ह्यातील बऱ्याच दिवसापासून गुटखा माफिया विरुद्ध कारवाया चालु आहेत तरी ही गुटखा विक्री चालूच आहे. बीड येथील बशिरगंज भागात क्लासिक ट्रेडर्स नावाने होलसेल किराणा दुकान आहे. या दुकानात साखर, पत्ती, तेल, यांच्या सोबत गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न प्रशासनाला मिळाली त्यांनी थोडाही विलंभ ना  करता शुक्रवार दिनांक 30 रोजी सकाळी सापळा रचून धाड टाकली या वेळी पोत्यामध्ये गुटखा साठऊन ठेवल्याचे दिसून आले. हा सर्व गुटखा प्रशासनाने जप्त केला असुन हा गुटखा जवळपास 50 हजार रूपये किमतीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असुन ही कारवाई सहायक आयुक्त इम्रान हाश्मी, अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा