Subscribe Us

header ads

गोपाळपूर ग्रामपंचायतीची भष्टाचाराची चौकशी करा; शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद यांना निवेदन

बीड स्पीड न्यूज 


गोपाळपूर ग्रामपंचायतीची भष्टाचाराची चौकशी करा; शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद यांना निवेदन

किल्ले धारूर/प्रतिनिधी-: मौजे गोपाळपूर या ग्रामपंचायतने आमचा गाव आमचा विकास अंतर्गत सन 2020-2022 या आर्थिक वर्षात पंधराव्या वित्त आयोगामधून करण्यात आलेल्या विविध विकास कामे करताना पूर्णपणे अंदाजपत्रकाला बगल देऊन मनमानी पद्धतीने कामे करण्यात आलेली असून गेल्या पाच वर्षांमध्ये सदर ग्रामपंचायत ने गावात एकही वेळेस ग्रामसभा घेतलेली नसून फक्त ठराव रजिस्टर ला ग्रामसभा व मासिक सभा घेतल्याचे दाखवून अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यामध्ये:- १) धुर फवारणी मेडिक्लोर ब्लेचिंग २) पथदिवे खरेदी दुरुस्ती ३) मुतारी बांधकाम शौचालय बांधकाम व दुरुस्ती ४) स्वच्छता कोविड उपाय योजना ५) वृद्धांसाठी बाक खरेदी ६) एलईडी दिवे दुरुस्ती करणे ७) शिक्षक कॉलनी कच्चा रस्ता तयार करणे ८) पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्ती करणे ९) नवीन स्त्रोत पाणीपुरवठा करणे १०) गाव अंतर्गत पाईपलाईन करणे ११) जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा हैद बांधकाम १२) भुयारी गटारी करणे १३) नालीसफाई १४) वृक्ष लागवड १५ ) टीसीएल, 16) पाणीपुरवठा दुरुस्ती १7) सार्वजनिक आरोग्य दिवाबत्ती परिसर स्वच्छता सांस्कृतिक खर्च १8) पथदिवे दुरुस्ती, 19) स्मशानभुमी रस्ता व सुशोभिकरण करणे या बाबीवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचे दाखवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून सदर भष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद यांना निवेदन देण्यात आले आहे. दिनांक 8/10/2022 रोजी पर्यंत दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथि दिनांक 15/10/2022 रोजी पासून शिवसेनेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्यासमोर अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी शिवसेना तालुका सचिव बाबासाहेब सराफ, अभिषेक भारस्कर,विजय भारस्कर, विकास काजळे,बलभीम मुंडे यासह गोपाळपूर ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा