Subscribe Us

header ads

शौचालयाच्या बिलात 8 हजारांची लाच घेताना ग्रामसेवकला रंगेहात पकडले

बीड स्पीड न्यूज 

शौचालयाच्या बिलात 8 हजारांची लाच घेताना ग्रामसेवकला रंगेहात पकडले


अंबाजोगाई | प्रतिनिधी -: सर्वजनिक शौचालयाच्या कामाचे बिल काढून देण्याकरता 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना धावडी (ता. अंबाजोगाई) येथील ग्रामसेवक आशोक विठ्ठल राव पुजारी याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे बीड शाखेच्या पथकाने  रंगेहात पकडले. अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालयात मंगळवारी (दि.13) दुपारी ही कारवाई करण्यात आली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत धावडी  येथील सार्वजनिक शौचालयाचे  काम करण्यात आले होते. या कामाचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून ग्रामसेवक अशोक पुजारी (रा.ह.मु. हनुमान मळा अंबाजोगाई) याने कंत्राट दाराकडे 10  रुपयांची मागणी केली होती. याबाबत कंत्राटदाराने बीड एसीबी कडे तक्रार केली होती. पडताळणी दरम्यान तडजोडी अंती अशोक पुजारी यांने 8 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला होता. अशोक पुजारी याने कंत्राटदाराकडून लाचेपोटी 8  हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.याप्रकरणी ग्रामसेवक अशोक पुजारी याच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.एसीबीचे पोलिस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे, कर्मचारी सुरेश सांगळे, हनुमंत मोरे आदींनी या कारवाई पार पडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा