Subscribe Us

header ads

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आत्मदहनासह आमरण उपोषण करणार-- विशाल सराफ

बीड स्पीड न्यूज 


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आत्मदहनासह आमरण उपोषण करणार-- विशाल सराफ

धारूर/प्रतिनिधी-: धारूर तालूका अतंर्गत गोपाळपूर ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर,शिक्षक काॅलनी,वडारवाड, झालेल्या विविध विकास कामांची माहिती अर्ज करण्यात आला आहे.माहीती न मिळाल्यास १७ संप्टेबर पासून आमरण उपोषण करण्यात येईल असे पंचायत समिती धारूर यांना निवेदनद्वारे इशारा दिला आहे. काॅलनी,वडारवाड, झालेल्या विविध विकास कामांची माहिती अर्ज करण्यात आला आहे.
यामध्ये:-1) ग्रामपंचायतीने सन 2020 ते 2022 दरम्यान कोणकोणती विकास कामे केली ? विकास कामाची यादी द्यावी. या विकास कामासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारच्या कोणत्या योजनेतून किती निधी मिळाला. सदर निधी कधी व कसा खर्च करण्यात आला.2) आपल्या ग्रामपंचायतीच्या मागील तीन वर्षाच्या ऑडिट रिपोर्टची छायांकित प्रत द्यावी.3) ग्रामपंचायतीमध्ये एकूण तपशील द्यावा. किती कर्मचारी आहेत. त्यांना किती रूपये मासिक वेतन दिले जाते याचा.4) ग्रामपंचायतीला 2020 ते 2022 या दोन वर्षात प्रतिवर्षी कोणकोणत्या उद्देशासाठी शासनाकडून किती रूपये थेट अनुदान किंवा मदत रक्कम मिळाली ? या रक्कमेचा विनीयोग कोठे केव्हा व कसा झाला.5) 2020 पासून 2022आज तारखेपर्यंत ग्रामपंचायतीच्या एकूण किती ग्रामसभा भरवल्या गेल्या. प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित पुरूष व महिला सदस्यांची नावे व पत्ते मिळावेत.6)ग्रामसभेत मंजूर झालेल्या सर्व ठरावांची छायांकित प्रती मिळाव्यात.7) ग्रामपंचायत मधील किती कर्मचारी उपस्थित अन् उपस्थित असतात यांची माहिती द्याण्यात यावी.8) गावांमध्ये झालेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती द्याण्यात यावीअश्य्या अनेक मागण्या साठी सामाजिक कार्यकर्ता जयराम भोजने, माऊली फावडे, पत्रकार विशाल सराफ अदी सामाजिक कार्यकर्ता इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा