Subscribe Us

header ads

श्री साईराम अर्बनच्या वर्धापन दिनानिमित्त मयत खातेदारांच्या वारसाला चार लक्ष रुपयांची आर्थिक मदत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

बीड स्पीड न्यूज 


श्री साईराम अर्बनच्या वर्धापन दिनानिमित्त मयत खातेदारांच्या वारसाला चार लक्ष रुपयांची आर्थिक मदत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न


बीड | प्रतिनिधी -: आज दि 14 सप्टेंबर 2022 रोजी श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट बीड च्या शाहूनगर शाखेचा नववा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास मा.आमदार राजेंद्रजी जगताप साहेब व वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष श्री अशोकरावजी हिंगे साहेब उपस्थित होते. मा.आमदार राजेंद्रजी जगताप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट संस्थेचे शाहूनगर शाखेचे खातेदार श्री गवते प्रतिक विष्णू 

यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले.त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला.त्यांच्या या दुःखामध्ये सहभागी होऊन श्री साईराम परिवाराच्या वतीने अध्यक्ष मा. शाहीनाथजी परभणे साहेब यांनी मयताचे वारसदार वडील श्री गवते विष्णू त्रिंबक यांना चार लाख रुपयांचा धनादेश मा.आमदार राजेंद्रजी जगताप साहेबांच्या हस्ते देण्यात आला. त्याचबरोबर नीट परीक्षा २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात आला .यामध्ये कु.लांडे सुजाता सतीश,चि.घेणे व्यंकटेश गणेश, 

चि.गांगले सौरभ शिवाजी, चि.धांडे प्रथमेश गणेश, चि, जोशी रामानुज गणेश, कु.धोत्रे पल्लवी अशोक, चि.सुपेकर ऋषिकेश, चि.चव्हाण त्रिशाल सुनील, कु.हावळे चैत्राली रवींद्र, कु.लोखंडे सोनाली आबाजी या यशवंत विद्यार्थ्यांचा श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट तर्फे सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय बँको पुरस्कार, अर्थरत्न व अर्थविश्व पुरस्कार, दीपस्तंभ पुरस्कार, सहकाररत्न पुरस्कार मिळवणारी एकमेव असणारी संस्था श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट चे आर्थिक क्षेत्राबरोबरच 

सामाजिक व संस्कृतीक क्षेत्रात योगदान देत आली आहे.मागील दहा वर्षापासून अविरतपणे खातेदारांना सुविधा देण्याचे काम करत आहे.त्याचबरोबर विद्यार्थी, शेतकरी, तरुण व्यावसायिक, यांना मदतीचा आधार देण्याचे काम करत आहे .मागील दहा वर्षापासून ज्याप्रमाणे आपले प्रेम व विश्वास वेळोवेळी लाभला आहे असाच प्रेम व विश्वास पुढेही राहिल असा विश्वास मा.अध्यक्ष शाहीनाथ विक्रमराव परभणे साहेब यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास शिवाजीराव जाधव साहेब, अमोल महाराज डोंगरे, विष्णुपंत गवते, किशोर अप्पा पिंगळे, गव्हाणे साहेब,सरपंच प्रशांत लांडे, मते साहेब, शिवचरित्रकर ज्ञानदेवजी  काशीद सर, संस्थेचे जनरल मॅनेजर तळेकर सर, शाखा व्यवस्थापक बनकर सर तसेच खातेदार व कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा