Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा

बीड स्पीड न्यूज 


मिल्लिया महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा

बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात  दिनांक 14 सप्टेंबर 2022, बुधवार रोजी हिंदी विभाग व लिटररी  असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने "हिंदी दिवस" साजरा करण्यात आला. हिंदी दिवसा निमित्त "हिंदी काव्य पाठ प्रतियोगिता" व  "हिंदी दिवस विशेषांक" भित्तीपत्रक (वॉल मॅक्झिन) चे विमोचन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ व उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस. एस. यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉ. सय्यद हनीफ, हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर असद बेग, हिंदीचे प्रोफेसर पठाण ए.एम, उर्दू विभाग प्रमुख तथा पदव्युत्तर संचालक प्रा.फरीद नेहरी, इंग्रजी विभाग प्रमुख तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ.अब्दुल अनीस, अरेबिक विभाग प्रमुख डॉ. अब्दुल समद यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ.असद बेग यांनी केले. त्यांनी हिंदी भाषा व साहित्याचा विकास याबद्दल माहिती दिली. हिंदी समृद्ध भाषा असल्यामुळे आज हिचा विस्तार सर्व विश्वामध्ये झाला आहे असे सांगितले. डॉ. पठाण ए एम यांनी हिंदी भाषेचा इतिहास सांगितला.14 सप्टेंबर 1949 ला हिंदी भाषेस राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला व देशात सर्व ठिकाणी हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात येते असे सांगितले. प्रमुख अतिथी प्रा.फरीद नेहरी यांनी हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा असून हिंदी भाषेमध्ये गोडी व सहज पण असून प्रत्येक क्षेत्रामध्ये हिंदी भाषेचा वापर व्हावा असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सय्यद हनीफ यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदीचे मोठे योगदान असून हिंदी भाषेच्या विकासासाठी दैनंदिन व्यवहारात हिंदीचा जास्त वापर करावा असे सांगितले व सर्वांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर असद बेग यांनी केले तर आभार इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अब्दुल अनीस यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा