बीड स्पीड न्यूज
बीडमध्ये मुस्लिम महिलांचा ऐतिहासिक मोर्चा बिल्किस बानो यांच्यावर अत्याचार करणारांना परत अटक करा
बीड | प्रतिनिधी -: अन्यायाविरुद्ध संपूर्ण बीड जिल्ह्यातील महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. हजारो मुस्लिम महिलांना काढलेल्या या मोर्च्यात मुस्लीम समुदायाच्या काही प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आले 15 सप्टेंबर रोजी झालेल्या या आंदोलनात या महिलांनी बिल्किस बानो यांच्यावर अन्याय करणाऱ्यांना परत अटक करावी मौलाना कलीम सिद्दिकी यांची सुटका करावी. मुस्लीम धर्मात होणारा हस्तक्षेप थांबवावा आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन बीडच्या जिल्हाधिकार्यांना यावेळी देण्यात आले. बीडच्या संविधान बचाव संघर्ष समिती तर्फे हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या मोर्चात सहभागी झालेल्या हजारो मुस्लिम महिलांनी किल्ला मैदान ते बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत काढलेल्या या
मोर्चाला मुस्लीम समुदायाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या मोर्चात हजारो महिला सहभागी झाले होते. किल्ला मैदान येथून या मोर्चाला सुरुवात झाली कारंजा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर या मोर्चाचे एका सभेत रूपांतर झाले आणि तिथे मुस्लिम समाजाच्या पाच विद्यार्थिनी मोर्चाला संबोधित केले. भारत हा गंगा जमुना तहेजीबने चालणारा देश आहे. या देशावर सर्व धर्मांचा समान अधिकार आहे कोणत्याही एका धर्माचा हा देश नसून या देशातील प्रत्येक धर्माच्या प्रत्येक नागरिकांचा समान अधिकार आहे. बिल्किस बानो प्रकरणात सुटका करण्यात आलेल्या बलात्काऱ्यांना पुन्हा अटक करण्याची मागणी ही या महिलांनी केली. जर या प्रशासनाने आणि सरकारने काही केले नाही तर आम्ही अशाचपद्धतीने आंदोलन करीत रहू अशा इशारा आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी दिला या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. विविध मागण्यांचे निवेदन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली.
0 टिप्पण्या