Subscribe Us

header ads

लम्पीचा संभाव्य धोका व फैलाव टाळण्यासाठी लिंबागणेश येथे ग्रामसमृद्धी फाऊंडेशनच्यावतीने जनावरांचे मोफत लसीकरण

बीड स्पीड न्यूज 


लम्पीचा संभाव्य धोका व फैलाव टाळण्यासाठी  लिंबागणेश येथे ग्रामसमृद्धी फाऊंडेशनच्यावतीने जनावरांचे मोफत लसीकरण; लम्पी आजारांविषयी शेतक-यांत जनजागृती  :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

बीड | प्रतिनिधी -: सध्या जनावरांमध्ये आढळुन येत असलेल्या लम्पी आजाराविषयी सोशल मिडीयावर होत असलेल्या बातम्यामुळे पशुधन मालकांमध्ये भितीचे वातावरण असून ती दुर करत लम्पीचा संभाव्य धोका व फैलाव टाळण्यासाठी आणि शेतक-यांत जनजागृती करण्यात यावी तसेच जनावरांचे लसीकरण करण्यात यावे यासाठी ग्रामसमृद्धी फाऊंडेशन लिंबागणेश यांच्या मार्फत मोफत लसीकरण मोहीम लिंबागणेश येथिल पशुधन विकास आधिकारी डाॅ.अमोल मेहेरकर यांच्या मार्गदर्शनात ड्रेसर विक्रम ठाकर,शिपाई सुधाकर वैद्य तसेच विशेष सहकारी डाॅ.गणेश भोसले आदिंच्या सहकार्याने पशुवैद्यकीय दवाखाना लिंबागणेश येथे आज दि.१५ सप्टेंबर गुरूवार रोजीपासुन राबविण्यात येत असून पशुधन मालकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामसमृद्धी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले आहे.

लम्पी संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण गरजेचं:-डाॅ.गणेश ढवळे 
___
लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणं गरजेचं असल्याने सामाजिक दायित्व म्हणून मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून  लम्पी स्कीन आजार आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा तसेच केवळ गोवंशीय प्राण्यांमध्ये आढळुन येणारा देवी विषाणु गटातील कॅप्रीपाॅक्स प्रवर्गातील आजार असुन मांसाहार करणारांना सुद्धा धोका नसल्याचे पशुवैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे त्यामुळेच जनजागृती आवश्यक आहे. 

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपाययोजना;सुचनांचे पालन करा:-पशुधन विकास आधिकारी ,लिंबागणेश डाॅ.अमोल मोहोळकर 
____
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपाययोजना राबविण्यात येत असून शेतक-यांनी अफवांना बळी पडु नये,शंका वाटल्यास तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात गुरांना उपचारासाठी दाखल करावे. संसर्ग व फैलाव टाळण्यासाठी गोठ्यामध्ये ढास,माश्या,गोचिड होणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच गोठ्यांमध्ये सोडीयम हायपोक्लोराईड अथवा फिनेलची फवारणी करून स्वच्छता राखावी. 

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो.नं.८१८०९२७५७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा