Subscribe Us

header ads

खुशी राठोड हीचे नीट परिक्षेत सुयश

बीड स्पीड न्यूज 



खुशी राठोड हीचे नीट परिक्षेत सुयश

बीड, दि.10 (लोकाशा न्युज)ः- राष्ट्रीय पात्रता परिक्षा नीट याचे निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये आदर्श शिक्षक राजेंद्र राठोड यांच्या कन्या खुशी राजेंद्र राठोड हीने पहिल्याच प्रयत्नामध्ये एमबीबीएस पात्रतेसाठी आलेल्या नीट परिक्षेत 541 गुण घेवून सुयश प्राप्त केल्याने तिचे विविधस्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.स्वतःच्या मेहनत व परिश्रमावर हे यश संपादन केले आहे. लहानपणापासूनच खूप हुशार व होतकरू, जिद्दी आणि गुणी विद्यार्थीनी म्हणून सर्वपरिचीत आहे. या तिच्या यशाबद्दल वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना बीडच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच विविधस्तरातून तिचे कौतुक केले जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा