Subscribe Us

header ads

डॉक्टर दत्तात्रय फपाळ यांचा माजलगाव धरणात पोहताना बुडून मृत्यू

बीड स्पीड न्यूज 

डॉक्टर दत्तात्रय फपाळ यांचा माजलगाव धरणात पोहताना बुडून मृत्यू


माजलगाव प्रतिनिधी-:  माजलगाव धरणात पोहण्यासाठी गेलेले डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ (45)  यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालं. ही घटना आज रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचे तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटल आहे. ते गेल्या काही दिवसांपासून माजलगाव येथे वास्तव्यात होते. रोज सकाळी माजलगावच्या धरणामध्ये पोहायला जात होते.  दररोजच्या प्रमाणे रविवारी ते पोहायला गेले असताना पोहत पोहत ते  लांब गेले पोहत परत येत असताना त्यांना दम लागून बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार रोजी सकाळी घडली.  धरणामध्ये बुडालेल्या दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचे शोध घेण्याची मोहीम चालू आहे. बचाव कार्य पथकाला बोलवण्यात आली आहे घटनास्थळी तहसीलदार वर्षा मनाळे व माजलगाव शहर पोलिस उपस्थित आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा