Subscribe Us

header ads

बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना तात्काळ जेलमध्ये टाका - मौलाना आझाद युवा मंच

बीड स्पीड न्यूज 

बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना तात्काळ जेलमध्ये टाका - मौलाना आझाद युवा मंच 

माजलगाव, प्रतिनिधि: गुजरात दंगलीत गरोदार बिलकिसबानोवर गँगरेप व तीन वर्षाच्या लहान मुलीसह कुटुंबातील सात सदस्यांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या आरोपी अाजन्म शिक्षा भोगत असताना व देश स्वतंत्रतेचा पंच्यात्तरवा स्वर्ण महोत्सव साजरा करत असताना गुजरात सरकार व केंद्रीय गृह मंत्रालयाने वरील अकरा आरोपींची शिक्षा माफ करुन त्यांना बरी करुन टाकले. हा निर्णय माणूसकीला काळीमा फासणारा असून या निर्णयाचा मौलाना आझाद युवा मंच, बीड जाहिर निषेध करत आहे व देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, कायदामंत्री, अल्पसंख्याक कार्यमंत्री, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग व मुख्यमंत्री, गुजरात सरकार यांना माजलगाव उपविभागीय अधिकारी साहेब मार्फ़त मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सलीम यांनी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, समाजसेवक, युवक वरील आरोपींना दिलेली माफी निर्णय रद्द करावा या आशयाचे निवेदन दिले आहे.नागरिकांनी देशात आता पर्यंत झालेल्या बलात्काराच्या तमाम घटनांच्या विरोधात निषेध नोंदवावा व दिल्ली मधील निर्भया बलात्कार व हत्या प्रकरण असो की हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरण असो देशातील तमाम जनता जशी रस्त्यावर उतरली व या आरोपींना शिक्षा होण्यापर्यंत शांत बसली नाही सरकारला सळाे की पळाे करुन सोडणाऱ्या जनतेने बिलकिसबानो बलात्कारातील आरोपीँची शिक्षा माफ करु नये त्यांना सुप्रीम कोर्टाने दिलेली शिक्षा कायम ठेवण्यात यावी यासाठी रस्त्यावर उतरावे जेणे करुन देशातील जनतेचा विश्वास संविधान, लोकशाही व न्यायपालिका बद्दल कायम राहीन नसता प्रत्येक जन जात, धर्म बघून न्याय मागण्यासाठी आंदोलन करतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात महिलांचा आदर करा, सबका साथ सबका विकास म्हणणारे मोदी साहेब या प्रकरणी काहीच बोलत नाही. राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेवून आरोपींची माफ झालेली शिक्षा रद्द करण्याचे निर्देश गुजरात सरकार व केंद्रीय गृह मंत्रालयाला द्यावे, नसता मौलाना आझाद युवा मंच येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. यावेळी मौलाना आझाद युवा मंच चे जिल्हाध्यक्ष नुमान चाऊस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सलीम, राष्ट्रवादीचे युवा नेते राजुभाई कुरेशी, मौलाना आझाद युवा मंचचे तालुका अध्यक्ष फेरोज इनामदार, मौ. आ. युवा मंच चे तालुका सचिव अखिल कुरेशी, राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक शहराध्यक्ष सुलतान मंसुरी, मौ.आ.युवा मंच तालुका संघटक मौजम कुरेशी, युवा नेते सुमेर पटेल, मौ.आ.युवा मंच तालुका उपाध्यक्ष वाजेद शेख, मौ.आ.युवा मंच युवक शहर अध्यक्ष साबेर कुरेशी, फारूक आतार, वसीम आतार, सय्यद मोहम्मद नासेर, शादमान खान, इलियास बागवान, माहदी हसन, फैजान शेख, अशोक मेंडके सर, मोहम्मद चाऊस, आसेफ खान, गुड्डू सय्यद, समीर शेख, बाबा काझी, समीर सिद्दीखी, शेख साजेद, नय्युम शेख, आवेज सिद्दिकी व आदी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा