Subscribe Us

header ads

जमीयत च्या सद्भावना कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित रहा - जमीयत उलेमा ए हिंद

बीड स्पीड न्यूज 


जमीयत च्या सद्भावना कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित रहा - जमीयत उलेमा ए हिंद 


बीड (प्रतिनिधी) - जमीयत उलेमा ए हिंद ने रविवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत बार्शी रोडवरील हॉटेल गोल्डन चाॅइस मध्ये सद्भावना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जमीयत उलेमा ए हिंद चे बीड जिल्हाध्यक्ष मुफ़्ती अब्दुल्ला साहब कासमी, सद्भावना मंचचे निमंत्रक मुज्तबा अहेमद खान, सेवानिवृत्त प्राचार्य डी.जी. तांदळे, काजी मुजीबुर्रहमान, सय्यद हसीन अख्तर, यकीन सर आदींनी केले आहे.या कार्यक्रमामध्ये देशभरात सध्या सुरू असलेल्या स्थितीवर मंथन केले जाणार आहे. यामध्ये मुस्लिम बांधवांसह इतर धर्मीय बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. याशिवाय जमिनीचे स्थानिक पदाधिकारी आणि सदस्य यांचाही समावेश असेल. जमीयत कडून संयुक्त मेळावे भरविणे, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे, हात मजूर, शेतकरी आणि मागासलेल्या लोकांची सेवा करणे, विधवांना मदत करणे, अमली पदार्थांना आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे, परस्पर संवादातून शांततापूर्ण तोडगा काढणे, पर्यावरणाचे संरक्षण व्हावे याकरिता वृक्षारोपण करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, आपण राहत असलेला परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे, आदी विषयांवर चर्चा सत्र व मंथन करण्यात येणार आहे. अलीकडच्या काही काळात आपण सर्व देश बांधव हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत की, काही असामाजिक शक्ती हिंदू-मुस्लीम धर्मीयांमधील बंधुभाव आणि सौहार्दता संपवून जातीय सांप्रदायिकता निर्माण करत देशाचे वातावरण खराब करत आहेत. याला कुठेतरी आळा बसणे आवश्यक आहे. याकरिता जमीयत उलेमा ए हिंद मुस्लिम समाजासह इतर सर्व धर्म बांधवांना एकत्र जोडून आपल्या भारत देशासाठी बंधुभाव कायम राहावे याकरिता सातत्याने कार्य करत आहे. यासाठी जमीयतने देशात एक चळवळ यशस्वीपणे चालू ठेवली आहे. भारत देश आपल्या सर्वांची प्रिय मातृभूमी आहे. या मातृभूमीमध्ये आपण शतकानूशतकापासून सर्वधर्मीय गुण्या गोविंदाने एकत्र राहत आहोत. प्रत्येक भारतीयाने द्वेष भावनांची भिंत तोडून देशात राहणाऱ्या सर्व हिंदू-मुस्लीम बांधवांना एकत्र आणणे, प्रत्येकाच्या धर्माचे आदर करणे, संवेदनशील होऊन आपल्या एकसंध देशाचे रक्षण करणे, आदी बाबींवर विचार मंथन होणार आहे. या कार्यक्रमात जमियत उलमा ए हिंद चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हाफिज नदीम साहब, ह.भ.प. श्री. महादेव महाराज चाकरवाडीकर शिवचरित्रकार ज्ञानदेव काशीद, फादर संजय गायकवाड, भिक्खू धम्मशील शिवनी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत  सद्भावना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन मुफ्ती अब्दुल्लाह साहब कासमी, प्रा. सुशीला ताई मोराळे, राजकुमार कदम, डी.जी. तांदळे, मौलाना साबीर रशिदी, मुज्तबा अहेमद खान, काजी मुजीबुर्रहमान, सय्यद हसीन अख्तर, यकीन सर, रफिक बागवान, अॅड. शेख सरफराज, हमीद पाले खान, शेख अजहर, मोहम्मद खमरोद्दीन, काजी मोहम्मद जाफर, हाफिज मोमीन अफसर, आदींनी केले आहे. तरी शहरातील बार्शी रोडवर असलेल्या गोल्डन चॉईस हॉटेल मध्ये रविवार दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२ ते ३ वाजता होणाऱ्या या सद्भावना कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जमीयत उलेमा ए हिंद कडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा